
बॉक्स ऑफिसवर मराठी शाळा कडाडल्या; Krantijyoti Vidyalay Marathi Madhyamने पार केला १० कोटींचा पल्ला
२०२६ या नव्या वर्षाची सुरुवात हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटाने दमदार केली. महाराष्ट्रात मराठी भाषा आणि मराठी शाळांचं अस्तित्व अबाधित राहावं यासाठी हेमंत ढोमे यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने केलेला प्रयोग यशस्वी झाला असून प्रेक्षकांनी शो हाऊसफुल्ल करत मेकर्सना दाद दिली आहे. महाराष्ट्रभरात सकाळी ७ ते रात्री १२ पर्यंतचे सगळे शो हाऊसफुल्ल असून या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करत बक्कळ कमाई केली आहे. जाणून घेऊयात १ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटाने किती कमाई केली आहे. (Marathi Movie 2026)
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटाने पहिल्या दिवसाची ओपनिंग ७ लाखांनी केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ४५ लाख, तिसऱ्या दिवशी १.०५ कोटी, चौथ्या दिवशी १.५ कोटी, पाचव्या दिवशी ५ लाख, सहाव्या दिवशी ५ लाख, सातव्या दिवशी ५ लाख, आठव्या दिवशी ५५ लाख कमवत पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने ५.७५ कोटी कमावले होते. पुढे नवव्या दिवशी ६ लाख, दहाव्या दिवशी १.६५ कोटी, अकराव्या दिवशी २.१ कोटी, बाराव्या दिवशी ९ लाख कमवत आत्तापर्यंत एकूण १०.१९ कोटी कमावले आहेत. (Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam)
मराठी शाळेच्या वास्तवाशी जोडलेली आणि भावनिक नाळ निर्माण करणारी कथा मांडणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ सध्या महाराष्ट्रभर चर्चेत आहे. सकाळी ७ वाजताचा पहिला शो असो वा रात्री १२ वाजताचा शेवटचा शो, दोन्ही वेळांना चित्रपटगृहं हाऊसफुल भरताना दिसत आहेत. हिंदी आणि दाक्षिणात्य बिग बजेट चित्रपटांच्या स्पर्धेतही या मराठी चित्रपटाने आपले स्थान ठामपणे अधोरेखित केले आहे.

प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद पाहून अनेक चित्रपटगृहांमध्ये (सिंगल स्क्रीन) इतर चित्रपटांचे शो कमी करून ‘क्रांतिज्योती विद्यालय– मराठी माध्यम’चे शो वाढवले जात आहेत. प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चित्रपटाचे भरभरून कौतुक होत आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे, कलाकारांची कामगिरी, संगीत आणि कथानक यांची विशेष दखल प्रेक्षक घेत आहेत.
याबद्दल लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “मराठी प्रेक्षक दर्जेदार आणि आशयपूर्ण चित्रपटाला नेहमीच मनापासून साथ देतो. ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ला मिळणारा प्रतिसाद प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर अपेक्षेपलीकडचा आहे. इतका मोठा आणि सातत्यपूर्ण प्रतिसाद आम्ही कल्पनाही केली नव्हती. सकाळपासून रात्रीपर्यंत हाऊसफुल शो, प्रेक्षकांच्या डोळ्यात दिसणारी भावुकता आणि चित्रपटानंतर मिळणाऱ्या प्रतिक्रिया हे सगळं अत्यंत भारावून टाकणारं आहे. चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन देण्याची संस्कृती हीच मराठी चित्रपटसृष्टीची खरी ताकद आहे.” (Hemant Dhome)
================================
हे देखील वाचा : Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam चित्रपटाची ‘धुरंधर’ला जोरदार टक्कर!
================================
‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपट सध्या प्रदर्शित असून यात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट झळकत आहे. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले असून, क्षिती जोग निर्माती आहेत. सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ आहेत.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi