बॉलिवूडचा He-Man हरपला; ज्येष्ठ महान अभिनेते Dharmendra यांचं ८९व्या वर्षी

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Teaser: शाळेच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित !
मराठी शाळांची घटती संख्या, पटसंख्येतील घट आणि मातृभाषेतील शिक्षणाची आवड कमी होण्याचे चित्र सध्या दिसत आहे. आणि याच विषयावर हेमंत ढोमे लिखित आणि दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. मराठी शाळांच्या अस्तित्वाच्या लढ्याला अधोरेखित करणारा हा चित्रपट अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या टीझरमुळे चर्चेचा विषय ठरला आहे.(Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Teaser)

हेमंत ढोमे (Hemat Dhome) यांच्या कथाविषयात नेहमीच आपल्या घरातील, आपल्या समाजातील सत्य गोष्टी दाखवल्या जातात, ज्यामुळे ते प्रेक्षकांना खूप जवळचे वाटतात. आता या चित्रपटाद्वारे एकदा पुन्हा शाळेतील आठवणी आणि नातेसंबंधांच्या गोड गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. टीझरमध्ये शाळा बंद होण्याच्या संकटाशी सामना करत असताना, जुने विद्यार्थी अनेक वर्षांनी एकत्र येऊन शाळेला भेट देतात. या भेटीनंतर सुरू होतो, त्यांच्यातल्या शाळेतील आठवणी, नात्यांचे पुनरावलोकन आणि शाळेप्रती असलेली प्रेमभावना.

या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांसोबत नवीन दमदार चेहऱ्यांची टीम दिसणार आहे. मुख्य भूमिका साकारणारे सचिन खेडेकर (Sachin Khedekar) हे शाळेचे मुख्यध्यापक म्हणून दिसतील. तसेच, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर आणि मराठी चित्रपटात पहिल्यांदाच प्रमुख भूमिकेत दिसणारी प्राजक्ता कोळी हिचा ही समावेश आहे.चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात की, “शाळा ही आपल्या आयुष्याचा पाया असते. शाळेतच पहिली भिती, पहिला राग, पहिली मैत्री आणि पहिलं प्रेम यांचा अनुभव घेतला जातो. त्यामुळेच या चित्रपटात मराठी शाळेचे महत्त्व, त्या शाळेतील आठवणी आणि त्या सगळ्या नात्यांचे रंग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मी खात्री बाळगतो की, प्रेक्षकांना त्यांच्या शाळेच्या आठवणी जागतील आणि मराठी शाळा पुन्हा भरतील.” (Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Teaser)
===============================
===============================
‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपट १ जानेवारी २०२६ पासून चित्रपटगृहात दाखवला जाणार आहे. या चित्रपटाचे निर्माते क्षिती जोग आणि सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्मस्) आणि अजिंक्य ढमाळ आहेत. या टीमने यापूर्वी ‘झिम्मा’ आणि ‘झिम्मा २’ यांसारखे यशस्वी चित्रपट तयार केले होते. संपूर्ण चित्रपट एका भावनिक आणि प्रेरणादायक सफरीची गोड आठवण देणार असावा, जो मराठी शाळांवरील प्रेम आणि त्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकणार आहे.