Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

April May 99 Movie: ‘एप्रिल मे ९९’ आता २३ मे

Jr NTR : दादासाहेब फाळकेंच्या भूमिकेत दिसणार RRRचा सुपरस्टार; राजामौली

Amitabh Bachchan : बच्चन यांच्या कुठल्या गाण्यावर राजेश खन्नांनी सडकून

Amir Khan : दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकसाठी आमिर-हिरानी पुन्हा एकत्र!

Criminal Justice 4: माधव मिश्रा इज बॅक; ट्रायअॅंगल मर्डर मिस्ट्री

Madhuri Dixit : माधुरीला अभिनयात नाही, तर ‘या’ गोष्टीत करायचं

Madhuri Dixit : २३ वर्षांपूर्वी आलेल्या ‘त्या’ चित्रपटातील गाणं शुट

Gulkand : बॉक्स ऑफिसवर सई-प्रसादच्या ‘गुलकंद’चा गोडवा!

PSI Arjun Marathi Movie: ‘पी.एस.आय. अर्जुन’ चित्रपटाच्या ‘प्रमोशनल साँग’चा व्हिडीओ प्रेक्षकांच्या

Banjara Marathi Movie: ‘भावनांची भटकंती’, ‘बंजारा’ सिनेमाचे टायटल साँग प्रदर्शित…

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

शापित गंधर्व- कुंदनलाल तथा के एल सहगल

 शापित गंधर्व- कुंदनलाल तथा के एल सहगल
कलाकृती तडका बात पुरानी बडी सुहानी

शापित गंधर्व- कुंदनलाल तथा के एल सहगल

by धनंजय कुलकर्णी 11/04/2020

कुंदनलाल तथा के एल सहगल भारतीय सिनेमासंगीतातील ध्रुव तारा होते. आज ११ एप्रिल, त्यांची ११६  वी जयंती. (जन्म : ११ एप्रिल १९०४) त्यांची कारकिर्द केवळ १०-१२ वर्षाची; पण या छोट्याश्या कालखंडात ध्वनीमुद्रणाचे तंत्र पुरेसे विकसित झाले नसतानासुद्धा त्यांनी आपल्या स्वराने रसिकांना झुलविले. सैगल यांच्या स्वरांचा व गाण्यांचा हॅंगओव्हर पुढच्या दोन पिढ्यांवर कायम होता. त्यांची गाणी ऐकताना एक दमदार / उबदार / आश्वासक स्वर आपल्या कानी पडतोय अशी रसिकांची भावना असे. त्यांच्या एका गाण्याचा किस्सा तसा बराच लोकप्रिय असला तरी नवीन पिढीच्या वाचकांकरीता तो सांगणं आवश्यक ठरावे.

संगीतकार नौशाद अली यांनी आपल्या आत्मचरीत्रात याचा उल्लेख केला आहे. त्यांची आणि सैगल यांची पहीली भेट १९४५ साली कारदार स्टुडिऒत झाली. पूर्ण टक्कल, डॊळ्यावर जाड भिंगाचा चष्मा यामुळे त्यांनी सैगल यांना ओळखलंच नाही. त्या काळात सैगल पूर्णपणे मद्याच्या आहारी गेले होते. मद्य घेतल्या शिवाय ते गातच नव्हते. सैगलचा आवाज आपल्या सिनेमात पाहिजे या स्वार्थी विचारापोटी कुणीही त्यांना या व्यसनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न तर सोडाच उलट उद्युक्तच करत होते. नौशाद यांना सैगल यांच्याकडून ’शहाजहॉं’ (१९४६) करीता गाणी गावून घ्यायची होती. गाण्याच्या रिहर्सलच्या वेळी सैगल टेकच्या आधी आपल्या ड्रायव्हरला बोलावून ’काली पांच लावो’ असं सांगायचे. ड्रायव्हर गाडीतून व्हीस्की घेवून यायचा आणि एका ग्लासात भरून द्यायचा. मद्य घेतल्यावर सैगल गायचे. दारू घेतल्याशिवाय मला गाता येणारच नाही असा त्यांचा ग्रह झाला होता. नौशाद यांनी त्यांचा हा समज खोटा आहे हे सिध्द करायचे ठरवले. पण सैगल म्हणजे त्या वेळचे टॉपचे गायक, तर नौशाद यांचा तो उमेदवारीचा काळ होता. दारू न घेता मी गाऊच शकणार नाही असं सैगल सांगू लागले.

नौशादनी एक प्रयोग करावयाचा ठरवले. ’जब दिल ही टूट गया, हम जी के क्या करेंगे’ या गाण्याच्या रेकॉर्डींगच्या वेळी ते सैगल यांना म्हणाले की आपण एक टेक ’काली पांच’ घेवून करूयात व एक टेक न घेता करूयात. नंतर दोन्ही टेक पैकी कोणता ठेवायचा ते तुम्ही ठरवा. हो नाही करत सैगल यांनी दोन्ही टेक केले. दुसर्‍या दिवशी सैगलयांना दोन्ही टेक ऐकवले. दारू न घेता गायलेला टेक सरस होता व तोच कायम झाला. सैगल यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते नौशाद यांना म्हणाले ’काश आप मुझे इससे पहले मिलते… अब तो बहुत देर हो चुकी है.’ सैगल मद्य न घेता गाऊ शकतात ही त्या काळातली मोठी ब्रेकींग न्यूज ठरली. पण तोवर खूप उशिर झाला होता. अति मद्य सेवनाने सैगल आतून पोखरले गेले होते.

नौशाद

आपल्याला मृत्यु आपल्या गावी यावा म्हणून ते जालंदरला गेले व तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अति मद्यपानाने एका गुणी गायकाला अकाली वयाच्या ४२ व्या वर्षी मृत्युच्या समीप नेले आणि १७ जानेवारी १९४६ ला सैगल यांचे निधन झाले.

धनंजय कुलकर्णी, पुणे

(मुक्त पत्रकार आणि सिने अभ्यासक)

https://youtu.be/hlPfTAAcD80

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Birthday Celebrations Bollywood Chitchat Bollywood Music Bollywood Topics Celebrity Birthday Celebrity Talks music
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.