Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Diwali 2025 : कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडेने चाहत्यांना दिल्या हटके शुभेच्छा!
दिवाळी म्हणजे आनंद आणि उत्साहाचा सण… दिव्यांच्या रोषणाईने आपल्या जीवनात एक नवी उमेद घेऊन येणाऱ्या या सणाची सगळेच फार आतुरनेते वाट पाहात असतात… मनोरंजनविश्वातील कलाकारही सतत काम केल्यानंतर दिवाळीचे काही दिवस आपल्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबासोबत घालवता येतात… अशातच आता कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे यांनी प्रेक्षकांना एक धमाल व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Diwali 2025)

तर, कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये श्रेया बुगडे ‘मंजुलिका’च्या भूमिकेत दिसतेय… आणि कुशल बाहुबलीमधील एका पात्राच्या गेटअपमध्ये दिसतोय… कुशलने व्हिडिओ पोस्ट करत लिहिलं आहे की. “आता या श्रेया बुगडेला बघा भुताच्या गेटअपमध्ये सुद्धा दिवाळीच्या कंदीलसारखी दिसते अगदी तेजस्वी; आणि मी पहा स्फोट झालेल्या सूतळी बॉम्ब सारखा दिसतोय. पण दिवाळीची खरी मज्जा ह्या दोन्ही गोष्टीं शिवाय नाहीच. आणि आज आम्ही तसेच दिसतोय, म्हणून आम्हा दोघांकडून ह्या अश्या शुभेच्छा. आनंदी रहा हसत रहा आणि तुमच्या वेडेपणात सामील होतील असेच मित्र जवळ बाळगा. दिवाळीच्या शुभेच्छा.” (Kushal Badrike and Shreya Bugade)
================================
हे देखील वाचा : दिवाळीत Thama आणि प्रेमाची गोष्ट २ येणार आमने-सामने!
================================
दरम्यान सध्या श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवताना दिसत आहे. या कार्यक्रमाचं सुत्रसंचलन अभिनेता अभिजित खांडकेकर करत आहे… जवळपास १० वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवणारा ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रम आता नव्या अंदाजात भेटीला आला आहे… (Marathi Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi