
Sachin Pilgoankar आणि ‘क्योंकी सास भी…’ मालिकेचं कनेक्शन आहे तरी काय?
‘क्योंकी सास भी कभी बहु थी’ या मालिकेचा कुणी फॅन नसेल असं होऊच शकत नाही… तुलसी, मिहीर, बा, ही सगळी पात्र एकेकाळी आपल्याच कुटुंबाच भाग आहेत असं नक्कीच वाटत असेल… ८ वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही मालिका आता जवळपास १८ वर्षांनी परत सुरु होणार आहे… अर्थात या मालिकेमुळे स्मृती इराणी (Smriti Irani) देखील १८ वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असून ‘क्योंकी सास भी कभी बहु थी २’ येत्या २९ जुलै पासून स्टार प्लसवर टेलिकास्ट होणार आहे… पण तुम्हाला माहित आहे का… सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) यांचं आणि क्योंकी सास भी कभी बहु थी या मालिकेचं एक खास कनेक्शन आहे… काय आहे ते जाणून घेऊयात.. (Entertainment News)

‘क्योंकी सास भी कभी बहु थी’ मालिकेची निर्माती म्हणजे एकता कपूर (Ekta Kapoor) हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेच.. पण या मालिकेचं नाव एकता यांना चक्क सचिन पिळगांवकर यांनी सुचवलं होतं… याचा खास किस्सा सचिन यांनी त्यांच्या ‘हाच माझा मार्ग एकला’ या आत्मचरित्रात लिहिला आहे… तर, सचिन यांची ‘तु तु मैं मैं’ (Tu Tu Mein Mein) ही मालिका तुफान गाजत होती… त्यामुळे या मालिकेचा दुसरा भाग आणण्याची सचिन यांची इच्छा होती… आणि त्यामुळेच त्यांना पुढच्या भागाचं नाव ‘क्योंकी सास भी कभी बहु थी’ हे ठेवायचं होतं.. त्यांनी हे नाव पेटंट देखील केलं होतं… मात्र, ज्यावेळी जितेंद्र (Jitendra) यांना समजलं की नाव पेटंट आहे… तेव्हा त्यांनी सचिन यांना फोन करुन भेटायला बोलावलं..(Bollywood News)
================================
हे देखील वाचा : Priyanka Chopra : ‘बर्फी’तील झिलमिल ५ दिवसांत कशी घडली?
=================================
जितेंद्र सचिन यांना विनंती केली की, माझी मुलगी नवी मालिका सुरु करतेय त्यासाठी तिला ‘क्योंकी सास भी कभी बहु थी’ हे नाव आवडलं आहे तर तु त्याचे शीर्षक हक्क मला दे… सचिन यांनी जितेंद्र यांच्या विनंतीचा मान ठेवला आणि क्षणाचाही विलंब न करता क्योंकी सास भी कभी बहु थी हे नाव एकता कपूरला देऊन टाकलं.. जितेंद्र यांनी सचिन यांना शीर्षक हक्काच्या पैशांबद्दल जेव्हा विचारलं तेव्हा सचिन म्हणाले की,”जितुजी मला जी नावं आवडतात ती मी रजिस्टर करून ठेवतो. मला या संदर्भात एक मालिका करायची होती पण सध्या तरी ती होऊ शकत नाही आहे. आणि पैसे घेऊन नाव विकणाऱ्यातला मी नाही”. त्यानंतर पुढे रितसर प्रक्रिया करून मालिकेचं शीर्षक एकता कपूरने स्वतच्या नावावर पेटंट केलं आणि मग काय ‘क्योंकी सास भी कभी बहु थी’ मालिकेने पुढे जो इतिहास रचला त्याचे आपण सगळेच साक्षीदार आहोत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi