
‘क्योंकि सास भी कभी बहु थी’ मालिकेतील ‘त्या’ लोकप्रिय जोडीचे अखेर २३ वर्षानंतर लग्न !
टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक असलेली अश्लेषा सावंत (Ashlesha Sawant) आणि संदीप बसवाना (Sandeep Baswana) यांनी अखेर 23 वर्षांच्या नात्यानंतर लग्न केले आहे. या जोडप्याने 16 नोव्हेंबर रोजी वृंदावनमधील चंद्रोदय मंदिरात लग्न सोहळा पार पाडला. या खास सोहळ्याला फक्त त्यांच्या कुटुंबीयांनीच उपस्थिती दर्शवली. संदीप बसवाना यांनी या लग्नाबद्दल बोलताना सांगितले की, “अश्लेषा आणि मी एप्रिल महिन्यात वृंदावनला गेलो होतो आणि तिथल्या राधा-कृष्ण मंदिराशी आम्हाला एक अत्यंत खास नाता जाणवलं.” त्यांनी पुढे सांगितलं, “23 वर्षांच्या नात्याच्या पुढे, त्या वृंदावनच्या सहलीने आम्हाला एकमेकांसोबत विवाह करण्याची प्रेरणा दिली. आमच्या कुटुंबातील सर्वजण खूप आनंदित आहेत, कारण ते खूप दिवसांपासून आमच्या लग्नाची वाट पाहत होते.”(Sandeep and Ashlesha wedding)

आश्लेषा आणि संदीप यांनी त्यांचे लग्न साधेपणाने आणि परंपरेने केले. संदीप म्हणाले की, “आम्हाला आमच्या विवाहाला एक अत्यंत साधा आणि सुंदर मार्ग हवा होता. राधा-कृष्ण मंदिरात लग्न करण्यापेक्षा ते करण्याचा आणखी चांगला मार्ग कोणता असू शकतो?” त्याच वेळी, या जोडप्याने लग्नाचे फोटो सोशल मिडियावर शेअर करताना लिहिलं, “आणि अशाच प्रकारे, आम्ही श्री आणि श्रीमती म्हणून एका नवीन अध्यायात प्रवेश केला आहे… परंपरेने आमच्या हृदयात स्थान बनवले आहे. या सर्व आशीर्वादांसाठी आम्ही कृतज्ञ आहोत.”

अश्लेषा सावंतयावर म्हणाली की, “माझ्या आयुष्यातील प्रेमाशी अखेर लग्न केल्याबद्दल मी खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे. वृंदावन हे एक परिपूर्ण ठिकाण होते. आम्हाला तिथे एक अतिशय खोल नाता जाणवले. हा एक नैसर्गिक आणि उत्स्फूर्त निर्णय होता, आणि आम्ही तो केवळ आमच्या कुटुंबासाठी खाजगी ठेवण्याचा निर्णय घेतला.” तर संदीप बसवाना यांनी विनोदी अंदाजात सांगितले की, “इतकी वर्षे एकत्र राहूनही आम्ही लग्न का करत नाही, हा प्रश्न अनेक लोकांकडून विचारला जात होता, पण आम्हाला त्याचे उत्तर देताना कंटाळा आला होता. माझ्या मनात, आश्लेषा आणि मी नेहमीच विवाहित होतो. मला काहीही वेगळं वाटत नाही. हे असे काहीतरी होते जे आम्हाला कधीतरी करायचं होतं आणि अखेर ते घडलं. आम्ही आनंदी आहोत, आणि प्रेम व आशीर्वादांनी परिपूर्ण आहोत.” (Sandeep and Ashlesha wedding)
==========================
हे देखील वाचा: घराला लागलेल्या भीषण आगीतून ‘या’ व्यक्तीमुळे वाचला Shiv Thakare चा जीव !
==========================
अश्लेषा सध्या ‘झनक’ या मालिकेत दिसत असून, संदीप शेवटचं ‘अपोलिना’ या मालिकेत दिसला होता. 2002 मध्ये “क्यूंकी सास भी कभी बहू थी” या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर या दोघांची पहिली भेट झाली होती आणि तेव्हापासून त्यांचे नातं सुरु झालं.