
Lakshmichya Pavlani मालिकेचा प्रवास संपला; Isha Keskar च्या जाण्याचा TRP ला फटका!
स्टार प्रवाहवरील ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ (Lakshmichya Pavlani) ही मालिका कला आणि अद्वैत चांदेकर यांच्या केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करू शकली. घराघरात पोहोचलेली ही मालिका काही दिवसांपूर्वी एका मोठ्या बदलामुळे चर्चेत आली. मालिकेतील ‘कला’ ही भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा केसकर (Isha Keskar) हिने प्रकृतीच्या कारणास्तव मालिकेला निरोप दिला आणि त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला. (Lakshmichya Pavlani Serial)

ईशाच्या एक्झिटनंतर मालिकेच्या टीआरपीवरही त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. अखेर लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, ईशा केसकरने सोशल मीडियावर मालिकेशी संबंधित काही आठवणी शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमधून तिने मालिका अर्धवट सोडल्याबद्दल प्रेक्षकांची दिलखुलास माफीही मागितली आहे.

मालिका बंद होणार असल्याने अभिनेत्री इशा केसकरने मालिकेत काम करतानाच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. सोशल मिडीयावर व्हिडिओ शेअर करत ईशाने लिहिलं आहे की, कला… अचानक निरोप घेतल्याबद्दल मनापासून सॉरी… तुम्ही प्रेक्षकांनी केलेल्या प्रेमासाठी मी कायम ऋणी राहील. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग…” असं तिने म्हटलं. आणि मालिकेत काम करताना चे काही फोटोज व्हिडिओज एकत्र करून एक पोस्ट तिने केली आहे. (Lakshmichya Pavlani Serial)
==============================
==============================
काही दिवसांपूर्वीच ईशा ने मालिका सोडण्याचे कारण स्प्ष्ट करत एक पोस्ट केली होती. ईशाने दिलेल्या माहितीनुसार, परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत तिने मालिकेपासून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. “मी सप्टेंबरमध्येच मालिकेची टीमला कळवलं होतं की मी शारीरिक कारणांमुळे सुट्टी घेणार आहे. या वेळी माझ्या प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता होती, आणि त्यामुळे कथेवरही परिणाम होऊ शकत होता.” आधीच काही वेळा ईशा अस्वास्थ्यामुळे मालिकेतून अनुपस्थित होती. चिकनगुनियामुळे आणि अन्न विषबाधेने ती काही काळ रजेवर गेली होती. “त्यानंतर माझ्या डोळ्याच्या दुखापतीमुळे मी आणखी काही काळ विश्रांती घेणे आवश्यक ठरले,” अस ती म्हणाली होती.