Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam ने दिलं मराठी शाळांच्या शिक्षक-विद्यार्थ्यांना नवं

Ranapati Shivray Swari Agra Trailer: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या

Bigg Boss Marathi 6: ‘तो माझा हात कधीच सोडत नाही…’ राधा

Bigg Boss Marathi 6: सागरच्या सल्ल्यामुळे घरात मतभेदांचा भडका; सदस्यांमध्ये वैचारिक संघर्ष!

Sanam Teri Kasam सिनेमातील एका गाण्याच्या मेकिंगचा भन्नाट किस्सा!

डायलॉगशिवाय गांधी विचार मांडणारा Gandhi Talks; सिद्धार्थ जाधव झळकणार विजय

एक स्त्री म्हणून माफी…”, राकेश बापट प्रकरणावर Neha Shitole हिची

हमाली करणाऱ्या Roshan Bhajankarने कष्टाचे दिवस काढले; नशीबाने थेट उघडलं

“शिवरायांवर जर का आम्ही चित्रपट करत असू तर…”; Digpal Lanjekar

Rubaab Marathi Movie Trailer: प्रेम, संघर्ष आणि स्वाभिमान असलेल्या डॅशिंग

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Lakshmichya Pavlani मालिकेचा प्रवास संपला; Isha Keskar च्या जाण्याचा TRP ला फटका!

 Lakshmichya Pavlani मालिकेचा प्रवास संपला; Isha Keskar च्या जाण्याचा TRP ला फटका!
Lakshmichya Pavlani Serial End
टीव्ही वाले मिक्स मसाला

Lakshmichya Pavlani मालिकेचा प्रवास संपला; Isha Keskar च्या जाण्याचा TRP ला फटका!

by Team KalakrutiMedia 13/12/2025

स्टार प्रवाहवरील ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ (Lakshmichya Pavlani) ही मालिका कला आणि अद्वैत चांदेकर यांच्या केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करू शकली. घराघरात पोहोचलेली ही मालिका काही दिवसांपूर्वी एका मोठ्या बदलामुळे चर्चेत आली. मालिकेतील ‘कला’ ही भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा केसकर (Isha Keskar) हिने प्रकृतीच्या कारणास्तव मालिकेला निरोप दिला आणि त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला. (Lakshmichya Pavlani Serial)

Lakshmichya Pavlani Serial
Lakshmichya Pavlani Serial End

ईशाच्या एक्झिटनंतर मालिकेच्या टीआरपीवरही त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. अखेर लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, ईशा केसकरने सोशल मीडियावर मालिकेशी संबंधित काही आठवणी शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमधून तिने मालिका अर्धवट सोडल्याबद्दल प्रेक्षकांची दिलखुलास माफीही मागितली आहे.

Lakshmichya Pavlani Serial
Lakshmichya Pavlani Serial End

मालिका बंद होणार असल्याने अभिनेत्री इशा केसकरने मालिकेत काम करतानाच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. सोशल मिडीयावर व्हिडिओ शेअर करत ईशाने लिहिलं आहे की, कला… अचानक निरोप घेतल्याबद्दल मनापासून सॉरी… तुम्ही प्रेक्षकांनी केलेल्या प्रेमासाठी मी कायम ऋणी राहील. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग…” असं तिने म्हटलं. आणि मालिकेत काम करताना चे काही फोटोज व्हिडिओज एकत्र करून एक पोस्ट तिने केली आहे. (Lakshmichya Pavlani Serial)

==============================

हे देखील वाचा: ‘आई तेव्हाच होईल जेव्हा मी…’ अभिनेत्री Hruta Durgule हिने आई होण्याबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत 

==============================

काही दिवसांपूर्वीच ईशा ने मालिका सोडण्याचे कारण स्प्ष्ट करत एक पोस्ट केली होती. ईशाने दिलेल्या माहितीनुसार, परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत तिने मालिकेपासून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. “मी सप्टेंबरमध्येच मालिकेची टीमला कळवलं होतं की मी शारीरिक कारणांमुळे सुट्टी घेणार आहे. या वेळी माझ्या प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता होती, आणि त्यामुळे कथेवरही परिणाम होऊ शकत होता.” आधीच काही वेळा ईशा अस्वास्थ्यामुळे मालिकेतून अनुपस्थित होती. चिकनगुनियामुळे आणि अन्न विषबाधेने ती काही काळ रजेवर गेली होती. “त्यानंतर माझ्या डोळ्याच्या दुखापतीमुळे मी आणखी काही काळ विश्रांती घेणे आवश्यक ठरले,” अस ती म्हणाली होती. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Actress Isha Keskar Celebrity Entertainment Lakshmichya Pavlani Lakshmichya Pavlani serial Lakshmichya Pavlani serial end
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.