Taath Kana Movie Trailer: जिद्द आणि संघर्षाची उत्कंठावर्धक कथा दाखवणाऱ्या

Lalit Prabhakar : ‘प्रेमाची गोष्ट २’एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळे विषय मांडले जात आहेत… दर्जेदार कौटुबिंक चित्रपटांचा सपाटा लागलाच आहे… शिवाय आत्ताच्या लग्नसंस्थेवर भाष्य करणारे बरेच चित्रपटही येत असून अशातच आता ऋचा वैद्य आणि ललित प्रभाकर यांची प्रमुख भूमिका असणारा ‘प्रेमाची गोष्ट २’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे… या चित्रपटात प्रेक्षकांना आधुनिक काळातील अनोखी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे… नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला असून जाणून घेऊयात ट्रेलरबद्दल….(Lalit Prabhakar and Rucha Vaidya)

प्रेमाची गोष्ट २ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ललितच्या आयुष्यात लग्न, घटस्फोट आणि त्यानंतर पुन्हा समोर आलेलं जुनं प्रेम याची भन्नाट कथा पाहायला मिळणार आहे… या सगळ्यांमुळे त्याचं आयुष्य जणू एका वादळात सापडलं आहे. स्वतःच्या चुकांचा आणि नशिबाचा हिशेब करताना तो सगळ्याचा दोष देवाला देताना दिसतोय. परंतु देव त्याला खरंच नशिब बदलण्याची दुसरी संधी देणार का? आणि दिलीच, तरी लालितचं नशिब खरंच बदलेल का? याचं उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे. चित्रपटात आजच्या काळातील प्रेमाचे वास्तव, त्यातील बदलती नाती, डिजिटल युगातील संवादाचे रूप दिसणार आहे… या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि कथा सतीश राजवाडेंची असून प्रेक्षक फारच आतुर असून Gen Z जनरेशनला थिएटरकडे वळवून आणण्यासाठी हा खटाटोप आहे.. (Marathi movie 2025)
दरम्यान, आपल्या चित्रपचाबद्दल दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणतात, ‘’ही एक फ्रेश आणि आजच्या काळाशी सुसंगत अशी प्रेमकहाणी आहे. या चित्रपटात व्हीएफएक्सचं तंत्रज्ञान केवळ दृश्यात्मक सौंदर्य वाढवण्यासाठी नाही, तर कथा सांगण्याचा एक नवा मार्ग म्हणून वापरलं आहे. ही कथा जेन झी प्रेक्षक आणि त्यांच्या पालकांना एकत्र जोडणारी आहे. म्हणजेच संपूर्ण कुटुंबासाठी योग्य असा हा चित्रपट आहे.’’
================================
हे देखील वाचा : विजय देवरकोंडासोबत साखरपूडा झाल्यानंतर Rashmika Mandanna ची ‘ती’ पोस्ट व्हायरल!
=================================
एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचे निर्माते संजय छाब्रिया आणि सह-निर्माते अमित भानुशाली यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे… तसेच, या चित्रपटात ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्निल जोशी, भाऊ कदम (Bhau Kadam) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘प्रेम आणि नशिबाचा हा जादुई प्रवास’ प्रेक्षकांना २१ ऑक्टोबर म्हणजेच दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अनुभवायला मिळणार आहे. (Premachi Goshta 2 cast)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi