Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

crisis : Lalita Pawar आणि Ashok Kumar यांनी संकटाचे संधीत रुपांतर केले !
सिनेमातील चित्रीकरणाच्या दरम्यान झालेल्या घटनेतून एखाद्या कलावंताची इमेजच बदलून जाते. या अपघातात करीअर संपते की काय असे एका क्षणी वाटते पण आलेल्या संकटाचे आव्हान स्वीकारून त्याचे संधीत रुपांतर केल्याची काही उदाहरणे आहेत. जेष्ठ अभिनेत्री ललिता पवार १९४२ साली ‘जंग ए आजादी’ या सिनेमाचे शूट करीत होत्या. चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान मा. भगवान यांना त्यांच्या थोबाडीत मारायचे होते. शूटिंगच्या दरम्यान असे शॉट खोटं खोटं मारायचे असते. पण या शॉटमध्ये जिवंतपणा आणण्यासाठी मा. भगवानने खाडकन ललिताबाईच्या कानशिलात लगावली. (crisis)

भगवानची थप्पड इतकी जोरात होती की बाईंच्या डोळ्यांपुढे अंधार आला. त्या चक्कर येवून पडल्या. त्यांच्या कानातून रक्ताची धार येवू लागली. मेंदूकडून येणाऱ्या वाहिनीला इजा झाली आणि त्यांचा एक डोळा बारीक झाला. त्यांना फेशियल पॅरलिसीस झाले. वर्षभरानंतर जेंव्हा त्या शूट ला आल्या तेंव्हा त्यांच्या डाव्या डोळ्याच्या हालचाली अनियमित होत होत्या. पुढे त्यांनी या अपघातानंतर आलेल्या डोळ्याच्या अपंगत्वावर आपली अभिनय कारकीर्द नुसती चालूच ठेवली नाही तर बहरवली. आता खलनायकी पध्दतीच्या त्यांच्या भूमिकेत हा दुर्बल डोळा मोठी कामगिरी करून जायचा. त्यांचा खलनायकी अभिनय आणखी कपटी वाटायचा ! संकटाचे संधीत रुपांतर करा हा आजच्या मॅनेजमेंट काळातील संदेश ललिता पवार यांनी कित्येक वर्ष आधीच अमलात आणला. असाच काहीसा प्रकार जेष्ठ अभिनेते Ashok Kumar यांच्या बाबत देखील झाला होता. (crisis)
या किश्याला कारूण्याची किनार असली तरी दादामुनींनी त्यावर कशी मात केली हे समजून घेणं देखील तितकचं महत्वाचं आहे. अशोक कुमारला नायकाच्या रूपात बघितलेली पीढी आता वयाच्या सत्तरीच्या पुढे पोचली आहे. किस्मत, मशाल, भाई भाई, हावडा ब्रिज या पन्नासच्या दशकातील त्यांची पडद्यावरील इमेज ही हॅंडसम व तडफदार संवाद फेक करणार्या नायकाची होती. पण एकदा एका सिनेमाच्या शूटींगच्या वेळी अशी घटना घडली त्याने अशोक कुमारच्या आवाजालाच ग्रहण लागले. (Untold stories)

१९६२ साली आलेल्या ’राखी’ या चित्रपटाचं शूटींग मद्रासला चालू होतं. ए भीमसिंग या सिनेमाचे दिग्दर्शक होते. या सिनेमाच्या अखेरीस अशोक कुमार साकारीत असलेल्या भूमिकेला मरावयाचे असते. या मृत्युच्या प्रसंगाचे चित्रीकरण चालू होते. यात अशोक कुमारला गंभीर आजारी व गलीतगात्र झालेल्या व्यक्तीच्या धाप लागलेल्या आवाजात बोलायचे होते. ते काही केल्या जमत नव्हते. दिग्दर्शक ए भीमसिंग यांच काही समाधान होत नव्हतं. अखेरच्या घटका मोजत दम लागलेली व्यक्ती कशी बोलते हा फिल त्यांना हवा होता. शेवटी त्यांनी एक जालीम उपाय केला. फ्रीज मधील थंडगार पाणी मागवले त्यात पुन्हा बर्फाचे खडे टाकले. असे सहा ग्लास पाणी त्यांनी दादामुनींना प्यायला दिले. (crisis)

आधीच थंडीचे दिवस त्यात पुन्हा हा चिल्ड डोस याने दादामुनींना कापरे भरले. थंडीने त्यांना हुडहुडी भरली. असा अवस्थेत त्यांनी चित्रीकरण पूर्ण केले. दिग्दर्शकाला हवा तसा शॉट मिळाला पण शूटींग संपल्यावर दादामुनी तिथेच कोसळले. त्यांना थेट अॅम्ब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले. त्यांना न्यूमोनिया झाला. हा संसर्ग पुढे फुफ्फुसात शिरला व दादामुनींना बोलताना कायम दम लागू लागला. सिनेमा प्रदर्शित झाला फार काही यश नाही मिळालं पण अशोक कुमारला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आणि कायमच दुखणं त्यांच्या घशाशी लागलं.
============
हे देखील वाचा : Indeevar : संगीतकार आनंदजी यांनी इंदीवर यांना सुचवले होते हुक वर्ड !
============
पुढे ते प्रत्येक सिनेमात धाप लागल्यासारखे बोलू लागले आणि नंतर हिच त्यांची स्टाईल ठरली. हिच त्याची ओळख ठरली. १९६३ सालानंतर नायकाची भूमिका त्यांनी केली नाही पण मध्यवर्ती चरीत्र नायकाच्या भूमिका त्यांना मिळू लागल्या. एकेकाळी करारी आवाजात बोलणार्या अशोक कुमार यांना आपल्या बोलण्याची तर्हा बदलावी लागली. १९६८ साली आलेल्या ऋशिकेश मुखर्जींच्या ’आशिर्वाद’ या सिनेमातील ’रेलगाडी रेलगाडी’ हे गाणं त्यांनी याच स्टाईलमध्ये गायलं.