“आता ‘धर्मवीर 3’ नाही, तर ‘गुवाहाटी फाइल्स’ घेऊन येणार”, Mangesh

Lapandav मालिकेतल्या सखी-कान्हाचं हटके प्री-वेडिंग फोटोशूट पाहिलतं का?
Star Pravah वरील लोकप्रिय मालिका ‘लपंडाव‘मध्ये सध्या लग्नाच्या जल्लोषाची सुरूवात झाली आहे. सखी आणि कान्हाच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे, आणि त्यासोबतच मालिकेतील वातावरण आनंदाने गजबजले आहे. पण लग्नाआधी सखी आणि कान्हाने एक अत्यंत खास आणि हटके प्री-वेडिंग फोटोशूट केलं आहे, ज्यामुळे हे दृश्य प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच छाप सोडणार आहे. हे फोटोशूट सिनेसिटी स्टुडिओमध्ये पार पडले, जिथे जगभरातील प्रसिद्ध स्थळांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या होत्या. त्यामुळे सखी आणि कान्हाच्या प्री-वेडिंग फोटोशूटला एक अत्यंत ग्लॅमरस आणि सिनेमॅटिक टच मिळाला. हा प्रयोग मराठी मालिकांच्या दुनियेत एक नवाच अनुभव ठरला आहे, कारण हे पहिले प्री-वेडिंग फोटोशूट होते जे लपंडाव मालिकेच्या कथानकात दाखवले गेले.(Lapandav Marathi Serial)

यामध्ये सखी-कान्हाचे खास लूक तयार करण्यात आले आहेत.ज्यात पारंपरिक, आधुनिक आणि फ्युजन स्टाईलमध्ये. पारंपरिक लूकमध्ये सखीने नऊवारी साडी आणि आकर्षक दागदागिने परिधान केले, तर कान्हा एक क्लासिक मराठमोळ्या पोशाखात दिसला. आधुनिक लूकमध्ये दोघांनी स्टायलिश आणि ट्रेंडी कपड्यांमध्ये हटके अंदाज दाखवला. आणि फ्युजन लूकमध्ये पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत सखी आणि कान्हा यांनी एक नवीन आणि दिलचस्प लुक साकारला.

सिनेसिटी स्टुडिओमधील विविध आकर्षक लोकेशन्सवर घेतलेले फोटोशूट प्रत्येक फ्रेममध्ये मोहक आणि आकर्षक दिसले. या शूटमध्ये प्रत्येक क्षण आनंदाने भरलेला होता, आणि अभिनेता चेतन वडनेरे आणि अभिनेत्री कृतिका देव यांनी सांगितले की, हा अनुभव त्यांच्या करिअरमधील एक अविस्मरणीय दिवस ठरला. चेतन आणि कृतिका म्हणाले, ‘या शूटिंगच्या गडबडीतून एक वेगळा आणि मजेदार अनुभव मिळाला. संपूर्ण टीमसोबत हा दिवस एकदम धमाल गेला.’ यामुळे ही जोडी प्रेक्षकांना नवीन आनंद देणारी ठरली आहे, आणि हे शूट एक मोठ्या आणि भव्य क्षण म्हणूनच लक्षात राहणार आहे.(Lapandav Marathi Serial)
===========================
===========================
‘लपंडाव’ मालिकेने नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी वेगळं आणि नवीन देण्याचा प्रयत्न केला आहे. सखी आणि कान्हाच्या हटके प्री-वेडिंग फोटोशूटमुळे मालिकेच्या कथानकाला एक नवा रंग आणि उत्साह मिळणार आहे. या प्री-वेडिंग फोटोशूटमुळे सखी-कान्हाच्या प्रेमात एक खास वळण येईल, आणि प्रेक्षकांना देखील या दोघांच्या प्रेम कथा अधिक रंगात रंगताना दिसेल.