Prasad Oak : ‘वडापाव’मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी

Last Stop Khanda Movie Poster: प्रत्येकाच्या प्रेमाची कहाणी सांगणारा ‘लास्ट स्टॉप खांदा’ रूपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज !
आयुष्याचा प्रवास सुरू झाला की प्रत्येकालाच प्रेमाच्या थांब्यावर थोडा वेळ थांबावंसं वाटतं. कुणी त्या थांब्यावर कायमचं रमून जातं, कुणी फक्त काही क्षणांचा आनंद घेतं, तर कुणी या प्रवासातल्या आठवणी मनात साठवून पुढे निघून जातं. प्रेमाचा हा अनुभव प्रत्येकाच्याच आयुष्यात वेगवेगळ्या रूपात उमलत असतो. हाच प्रेमाचा वेध घेणारी कथा घेऊन येत आहे “लास्ट स्टॉप खांदा” हा संगीतमय चित्रपट. २१ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचं आकर्षक पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं असून, त्याला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळत आहे.(Last Stop Khanda Marathi Movie)

या चित्रपटाची निर्मिती शिवम फिल्म क्रिएशन सिग्नेचर ट्यून्स आणि स्नेहा प्रॉडक्शन्स यांनी केली असून, सचिन कदम आणि सचिन जाधव यांनी प्रस्तुत केले आहे. निर्माते प्रदीप मनोहर जाधव तर सहनिर्माते सचिन कदम आणि अमृता सचिन जाधव आहेत. कथा आणि पटकथा श्रमेश बेटकर यांनी लिहिली असून दिग्दर्शनाची धुरा विनीत परुळेकर यांनी सांभाळली आहे. चित्रपटात श्रमेश बेटकरसोबत जुईली टेमकर, निखिल बने, मंदार मांडवकर, शशिकांत केरकर, सुदेश जाधव, महेश करपेकर, प्रियांका हांडे, डॉ. सचिन वामनराव, गणेश गुरव, निशांत जाधव, गिरीश तेंडुलकर आणि जयश्री गोविंद अशी प्रभावी स्टारकास्ट आहे. तसेच पाहुणे कलाकार म्हणून प्रभाकर मोरे, धनश्री काडगावकर आणि अशोक ढगे झळकणार आहेत.

छायांकनाची जबाबदारी हरेश सावंत यांच्यावर असून कलादिग्दर्शन केशव ठाकूर यांचे आहे. संगीताची बाजूही तितकीच ताकदीची असून, श्रेयस राज आंगणे व श्रमेश बेटकर लिखित गीतांना श्रेयस राज आंगणे आणि किशोर मोहिते यांनी संगीत दिलं आहे. या चित्रपटातली गाणी कथेला अधिक खुलवतील असा विश्वास टीमला आहे.“लास्ट स्टॉप खांदा” हा चित्रपट एक साधा मुलगा आणि त्याच्या प्रेमकथेवर आधारित असला तरी तो फक्त एक प्रेमकथा न राहता प्रेक्षकांना स्वतःच्या आयुष्याशी रिलेट होईल असं वास्तव उलगडतो. नव्या दमाचे कलाकार, आकर्षक कथा, उत्कृष्ट दिग्दर्शन आणि हृदयाला भिडणारं संगीत यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच वेगळा अनुभव देणार आहे.(Last Stop Khanda Marathi Movie)
=============================
हे देखील वाचा: Bigg Boss मध्ये होणार अंडरटेकर आणि माईक टायसनची दमदार एन्ट्री !
=============================
२१ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या “लास्ट स्टॉप खांदा” ची आतुरतेने वाट पाहावी लागणार आहे. कारण हा फक्त एक चित्रपट नसून प्रत्येकाच्या आयुष्यातल्या प्रेमाच्या प्रवासाला स्पर्श करणारा एक भावनिक अनुभव ठरणार आहे.