दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
‘सत्यम शिवम सुंदरम’ची गाणी गायला लता मंगेशकर यांनी दिला नकार!
राज कपूर यांच्या आर के फिल्मच्या बरसातपासून लता मंगेशकर यांचा स्वर त्यांच्या चित्रपटांचा अविभाज्य असा घटक बनला. तिथून पुढे प्रत्येक चित्रपटात लता मंगेशकर यांचा आवाज असायचाच. राज कपूर यांच्या चित्रपटातील नायिका बदलत गेल्या पण नर्गीसपासून माधुरी दीक्षितपर्यंत आर के फिल्मच्या सर्व नायिकांना लताचाच स्वर होता. त्यामुळे गमतीने ‘राज कपूरची खरी नायिका लता मंगेशकरच’ होती असं म्हटलं जायचं. (Satyam Shivam Sundaram)
असं असतानाही राज कपूरच्या ‘मेरा नाम जोकर’ आणि ‘कल आज और कल’ या दोन चित्रपटात लता मंगेशकर यांचा स्वर नव्हता. योगायोगाने दोन्ही चित्रपटांना सुरुवातीला फारसे यश मिळालं नाही! सत्तरच्या दशकात आर के फिल्म्सचा महत्त्वकांक्षी असा ‘सत्यम शिवम सुंदरम’ (Satyam Shivam Sundaram) हा चित्रपट आला होता. या सिनेमाचे कथानक राज कपूर याच्या डोक्यात पन्नासच्या दशकापासून होते. खरंतर लता मंगेशकर हिला नायिका म्हणून घेऊनच हा चित्रपट त्यांना करायचा होता अशी देखील एक न्यूज त्या काळात मीडियात पसरली होती. पण तो प्रोजेक्ट बनलाच नाही.
‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटातील गाणी गायला लता मंगेशकर आधी तयार नव्हत्या. काही कारणाने राज कपूरसोबत त्यांचे काही मतभेद झाले होते. पण राज कपूरला मात्र या चित्रपटातील गाण्यासाठी लताचाच स्वर हवा होता. त्याने काय आयडिया केली? ज्याने लता मंगेशकर यांनी या चित्रपटातील गाणी गायली. खूप इंटरेस्टिंग असा हा किस्सा आहे.
राज कपूरच्या १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘बॉबी’ या चित्रपटानंतर त्यांनी आपला ड्रीम प्रोजेक्ट ‘सत्यम शिवम सुंदरम’वर (Satyam Shivam Sundaram) काम करायला सुरुवात केली. या चित्रपटातील बरीचशी गाणी पंडित नरेंद्र शर्मा यांनी लिहिली होते. अतिशय उत्कृष्ट वाड्मय मूल्य असलेले ही गाणी राजकपूर यांना खूप आवडली होती. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत गाण्याच्या सीटिंग देखील सुरू झाल्या होत्या पण लता मंगेशकर मात्र काही केल्या या चित्रपटातील गाणी गायला उत्सुक नव्हत्या, तयार नव्हत्या. राजकपूरला खूप टेन्शन आले होते. लताचा स्वरच या गाण्याला योग्य न्याय देऊ शकतो याची त्यांना पूर्ण खात्री होती.
मग त्यांनी एक आयडिया केली त्यांनी पंडित नरेंद्र शर्मा यांना विनंती केली, ”लताला माझ्या वतीने तुम्ही विनंती करा. तुमचे ती नक्की ऐकेल.” राज कपूर यांची ही मात्रा लागू पडली कारण पंडित नरेंद्र शर्मा यांना लता मंगेशकर आपल्या वडिलांच्या जागी मानत होती. जेव्हा पंडितजींचा फोन लता मंगेशकर यांना गेला तेव्हा लता मंगेशकर नकार देऊ शकले नाही. पंडितजींनी लताला फोन केला आणि सांगितले, ”बेटा तुझ्यासाठी खूप सुंदर गाणी दिली आहेत. येऊन तर बघ.” आता साक्षात पंडित नरेंद्र शर्मा यांचा फोन आल्यानंतर लता मंगेशकर काही करू शकल्या नाहीत. त्या स्टुडिओत गेल्या. गाण्याच्या ओळींवर लक्ष दिले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले.
========
हे देखील वाचा : ऋषी कपूरला घाबरून कॉटखाली लपून बसावे लागले!
========
कारण ओळी होत्या ’ईश्वर सत्य है.. सत्य ही शिव है… शिव ही सुंदर है’ हे गाणं राज कपूरच्या खास आर के स्टाईल आलाप असलेल्या पद्धतीने बनवण्यात आले. यातील कोरस देखील सुंदर होता. लता क्षणार्धात राजसोबत झालेले मतभेद विसरल्या. या गाण्याचे बोल आणि संगीत इतकं मधुर होतं की त्यामुळे व्यावहारिक जीवनातील वाद तिला क्षुल्लक वाटू लागले आणि आपले सर्वस्व ओतून लताने हे अप्रतिम गाणे गायले. कित्येक शाळांमध्ये आज देखील हे गीत प्रार्थना गीत म्हणून गायले जाते. एका संगीताच्या एका धाग्याने लता मतभेद विसरून गेली आणि एका अप्रतिम गाण्याची निर्मिती झाली.
२४ मार्च १९७८ या (Satyam Shivam Sundaram) होळीच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला. गायक मुकेश यांना हा चित्रपट अर्पित केला होता. त्यांनी गायलेलं शेवटचं गाणं ‘चंचल शीतल निर्मल कोमल’ याच चित्रपटात होते. झीनत अमानच्या अंगप्रदर्शनाने सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट दिले होते. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना सर्वोत्कृष्ट संगीतकार आणि छायाचित्रकार राघू कर्माकर यांना सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार हे दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. सुरुवातीला गायला नकार देणाऱ्या लता मंगेशकर यांनी नंतर या चित्रपटातील ११ पैकी ९ गाणी गायली!