मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
Bharti Singh Admitted In Hospital: भारती सिंह रुग्णालयात दाखल, लवकरच होणार मोठी शस्त्रक्रिया
लाफ्टर क्वीन भारती सिंह नेहमीच आपल्या टॅलेंटने सर्वांना हसवते. भारती काही रिअॅलिटी शोमध्येही दिसली आणि आता ही ती एका रिअॅलिटी शोचा भाग आहे. भारती सिंह कॉमेडियनचा हा प्रवास खरतर खूप खडतर होता. ती तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफबद्दलही चर्चेचा भाग असते. भारती युट्युबवर आपला रोजचा व्लॉग शेअर करते. नुकताच तिने आपल्या व्लॉगच्या माध्यमातून ती रुग्णालयात असल्याची माहिती दिली आहे.(Bharti Singh Admitted In Hospital)
व्लॉगमध्ये भारतीने आपल्या सर्व चाहत्यांसोबत शेअर केले आहे की, गेल्या काही दिवसांपासून तिला पोटात तीव्र वेदना होत होत्या, परंतु तिने अॅसिडिटी म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, वेदना तीव्र झाल्याने आणि सहन न झाल्याने भारती यांनी डॉक्टरांकडे धाव घेतली. जिथे तिला कळले की तिच्या पित्ताशयात खडे झाले आहेत. या समस्येवर उपचार करण्यासाठी आता ऑपरेशन करण्यात येणार असल्याचे भारती यांनी सांगितले. व्लॉगमध्ये भारतीची प्रकृती खूपच वाईट दिसत होती. तिला अशा अवस्थेत पाहून तिचे चाहते ही खूप चिंतेत पडले आहेत.
आपल्या व्हिडिओमध्ये भारतीने असेही सांगितले आहे की, ती आपल्या मुलाला खूप मिस करत आहे. हे सांगताना तिच्या डोळ्यातही पाणी आले होते. आपल्या व्लॉगमध्ये भारतीने सांगितले की, पोटात काही तरी इन्फेक्शन किंवा फूड पॉयझनिंग झाले आहे असे तिला प्रथम वाटले होते. पण जेव्हा तिला पित्ताशयात खडे असल्याचे निदान झाले, तेव्हा तीही स्तब्ध झाली. भारती यांच्यावर कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या आजारात अनेकदा शस्त्रक्रिया ही केली जाते.
===============================
हे देखील वाचा: Pushpa 2 The Rule सिनेमाचे पहिले गाणे ‘पुष्पा पुष्पा’ अखेर रिलीज
================================
आपल्या मुलाबद्दल बोलताना भारती म्हणाली की, पहिल्यांदाच ती आपल्या मुलापासून दूर आहे. “तिची आजी आणि मावशी तिची काळजी घेण्यासाठी घरी आहेत, पण मी तिच्या जवळ नाही. भारती यांचा मुलगा गोला हा केवळ २ वर्षांचा आहे.