India Pak Conflict : भारताचा पाकिस्तानवर Digital Strike; पाकिस्तानी कलाकारांचे

Bharat Jadhav :”… आणि लक्ष्मीकांत म्हणाले होते ते पण घर घेऊन टाक!”
मराठीतला कॉमेडीचा बादशाह म्हटलं की दोनचं नाव डोळ्यांसमोर आधी येतात ती म्हणजे अशोक सराफ (Ashok Saraf) आणि लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde). या दोघांनी एकत्रित धमाकेदार चित्रपट तर दिलेच पण वैयक्तिकरित्याही दोन्ही कलाकारांनी कसदार अभिनयाने आजही प्रेक्षकांच्या मनात जागा तयार करुन छेवली आहे. दुर्दैवाने लक्ष्मीकांत बेर्डे फार लवकर आपल्याला सोडून गेले पण त्यांच्या सोबत काम केलेल्या भरत जाधव (Bharat Jadhav) यांनी त्यांचा एक किस्सा एका मुलाखतीमध्ये सांगितला. (entertainment news)

भरत जाधव यांनी नुकतीच आरपार ऑनलाईनला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी लक्ष्मीकात बेर्डेंनी दिलेल्या आशिर्वादाबद्दल बोलताना म्हटलं की, “मला त्या माणसाने मला खूप मदत केली आहे.साध्या घरातला माणूस तो पण त्याने पण प्रत्येक टॅलेंटेड पोराला हात दिला आहे. एकदा आम्ही एका सिनेमाचं शूटिंग करत होतो. त्यावेळी माझं नाटक बरं चाललं होतं.’पछाडलेला’ यायच्या आधीचा किस्सा आहे. तर, तेव्हा माझं शूटिंग थांबलं आणि त्याचं लवकर पॅकअप झालं होतं आणि ते मुंबईला निघणार होते. त्यावेळी स्वानंदी आणि अभिनय छोटा होता. प्रिया ताई ते एकत्र मुंबईला जात होते. त्यावेळी त्यांचा मोठेपणा खरंच मी अनुभवला” (Laxmikant berde)

भरत पुढे म्हणाले की, ”माझी पत्नी सरिता आणि मुलगी सुरभी माझ्यासोबत तिथे आले होते. त्यांना मी दुसऱ्या दिवशी वेगळ्या गाडीने पाठवणार होतो. तर मला म्हणाले नाही नाही मी चाललोच आहे तर मी सोडतो पवईला. तेव्हा मी पवईला राहत होतो. त्या माणसाने व्यवस्थित माझी मुलगी सुरभीची काळजी घेतली. जिथे मी पवईला राहत होतो तिथे तर त्या घरापर्यंत येऊन मग त्यांनी बायकोला म्हटलं ‘अच्छा इथे का?’ बाजूला कोण राहातं? त्यावर सरिताने ‘अमक्या अमक्याचं घर’ असल्याचं सांगितल. ते लगेच सरिताला म्हणाले भरतला सांग ते पण घर घेऊन टाक.खरंच हा त्यांचा आर्शिवाद नाहीये मग काय आहे?” (Marathi celebrities story)
===========
हे देखील वाचा – खराखुरा ‘सुपरहिरो’ फरहान अख्तर; जीवाची बाजी लावून वाचवले एका कर्मचाऱ्याचे प्राण
===========
भरत जाधव यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत ‘पछाडलेला’ हा शेवटचा चित्रपट जरी केला असला तरी त्यापूर्वी त्यांनी ‘खरतनाक’, ‘बाप का बाप’, ‘मराठा बटालियन’ या चित्रपटांमध्ये स्क्रिन शेअर केली होती. तसेच, सध्या ‘आता थांबायचं नाय’ (Aata Thambaych Naay) हा भरत जाधव यांचा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला महाराष्ट्रभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. (Marathi movies)