Karishma Kapoor : संजय कपूरची ३० हजार कोटींची प्रोपर्टी कुणाला

Karishma Kapoor : संजय कपूरची ३० हजार कोटींची प्रोपर्टी कुणाला मिळणार? कोटींच्या मालमत्तेवरून वाद
काही महिन्यांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा EX नवरा उद्योगपती संजय कपूर याचं निधन झालं… दरम्यान, आता त्याच्या निधनानंतर त्याच्या ३० हजार कोटींच्या संपत्तीवरुन करिश्मा कपूर, संजयची तिसरी पत्नी प्रिया सचदेव यांच्यात आता वाद सुरु झाला आहे… संजय कपूरच्या ३० हजार कोटींच्या संपत्तीची मालकी नक्की कोणाकडे जाणार याकडे आता सगळ्याचंचं लक्ष लागलं आहे… (Bollywood News)

दरम्यान, संजय कपूर याच्या तिसऱ्या पत्नीने म्हणजेच प्रिया सचदेव हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या नावात मोठा बदल केला आहे.. आधी तिचं नाव प्रिया सचदेव कपूर असं होतं. मात्र, आता प्रोपर्टीच्या वादात तिने सोशल मिडियावर आपलं नाव प्रिया संजय कपूर असं लिहिलं आहे… तसेच, संजय कपूरच्या या प्रोपर्टीच्या वादात त्याची दुसरी पत्नी नंदिता महतानी हिने देखील या उडी घेतली आहे. शिवाय, पहिली पत्नी करिश्मा कपूर संजय कपूरच्या संपत्तीतील हक्क तिच्या मुलांना मिळावा यासाठी आग्रही आहे…
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्मा कपूरचे स्पष्ट म्हणणे आहे की, मला नाही पण माझ्या मुलांना संपत्तीमध्ये हक्क मिळालाच पाहिजे. ज्यावेळी करिश्मा कपूर आणि संजय कपूरचा घटस्फोट झाला होता, तेव्हा मोठी रक्कम संजयने करिश्माला पोटगी म्हणून दिली होती जी कोट्यावधींच्या घरात होती. त्यामुळे आता स्वत:साठी नाही तर मुलांच्या हक्कासाठी करिश्मा लढताना दिसत आहे…

तर,सोना समूहाच्या माजी अध्यक्षा संजय कपूर यांची आई राणी कपूर यांनी सोना बीएलडब्ल्यू प्रेसिजन फोर्जिंग्सच्या संचालक मंडळाला पाठवलेल्या पत्रात आरोप केला आहे की, “संजय कपूरच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंब दु:खात असताना काही लोकं कंपनीवर नियंत्रण मिळवण्याचा आणि कंपनी हडपण्याचा प्रयत्न करत आहेत”. त्यामुळे आता संजय कपूरच्या ३० कोटींच्या प्रोपर्टीत नेमके हक्क कुणाला मिळणार? सगळ्यांना समान हक्क मिळणार की सारं काही तिन्ही पत्नींच्या हातून निसटणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे…
================================
हे देखील वाचा : Karisma Kapoor : बबिता कपूरमुळे करिश्मा कपूरच्या पायाला झालेली दुखापत?
=================================
करिश्मा कपूरने २००३ मध्ये संजय कपूरशी लग्न केले होते. या लग्नातून त्यांना मुलगी समायरा आणि मुलगा कियान अशी दोन अपत्य आहेत. २०१६ मध्ये संजय आणि करिश्मा यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला होता. करिश्माला मुलांचा ताबा मिळाल्यानंतरही करिश्मा अनेक वेळा संजयसोबत दिसली होती.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi