‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
कार्गोः मृत्यूनंतरचे जग
मृत्यूनंतर आपलं काय होतं. आत्मा असतो का….आपल्या शरीर पुन्हा आपल्याला मिळतं का…असे अनेक प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर नेटफ्लिक्सवर 9 सप्टेंबर रोजी रिलीज झालेला कार्गो चित्रपट नक्की पहायला हवा. विक्रम मेसी आणि श्वेता त्रिपाठी यांच्या भूमिका असलेला कार्गो हा एक सायंस फिक्शन चित्रपट आहे. कार्गोचा ट्रेलर रिलीज झाला, तेव्हा चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली होती. पुनर्जन्म, मृत्यू आणि दानव याबाबत दिग्दर्शक आरती काडव यांनी सादर केलेला हा चित्रपट एक नवीन दृष्टीकोण प्रेक्षकांसमोर सादर करतो.
अनुराग कश्यप, नवीन शेट्टी आणि श्लोक शर्मा यांनी कार्गोची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची कथा एकदम हटके आहे. अंतराळात एक स्पेसशिप फरत असतं. या स्पेसशिपमध्ये एक प्रहस्थ नावाचा दानव रहात अशतो. स्पेसशिपचं नाव आहे पुष्पक…मानव आणि दानव यांच्यात एक तह झालाय, त्यानुसार त्या शिपचं काम चालतंय. पृथ्वीवर जी माणसं मरतात, त्यांचे आत्मे या दानवाकडे, स्पेसशिपवर जातात. त्या आत्मांना दुरुस्त करुन पुन्हा नव्या रुपात पृथ्वीवर पाठवण्याचे काम हा प्रहस्थ करीत आहे. गेले कितीतरी वर्ष हेच काम तो एकटा करतोय. या स्पेसशिपवर दुसरं कोणी नाही. बरं दानव म्हणजे मोठे दात, विद्रुप चेहरा असाही तो नाही. तर हा दानव तरुण आहे, देखणा आहे…तरीही एकाकी आहे.
अनेक वर्ष स्पेसशिपवर एकाकी रहाणा-या या दानवाच्या मदतीला एक मदतनीस तरुणी पाठवण्यात येते. युवष्का शेखर नावाची ही तरुणी प्रहस्थाच्या विरुद्ध स्वभावाची आहे. उत्साही आहे. तिला या एकाकी जीवन जगणा-या प्रहस्थाबाबत अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न कसे सुटतात, युवष्काच्या येण्यानं स्पेसशिपवर कसं वातवरण होतं हे या चित्रपटात पहाण्यासारखं आहे.
मुळात कार्गो चित्रपटाची कल्पना ही भन्नाट कॉमिक बुकसारखी आहे. इंग्रजी चित्रपटांच्या कथेसारखी काहीशी वेगळी कल्पना येथे मांडण्यात आली आहे. यमराज हा शब्द म्हटल्यावरही अनेकांना घाम फुटतो…पण कार्गोमध्ये या यमलोकचं स्वरुपचं वेगळं आहे. नेहमीच्या ठराविक साचेबद्ध बॉलिवूडपटांपेक्षा कार्गो नक्कीच वेगळा आहे. यात विक्रम मेसी आणि श्वेता त्रिपाठी सारख्या गुणी कलाकारांना पहिल्यांदाच प्रमुख भूमिका मिळाली आहे. विक्रम मेसीनं याआधी दिपिका पादुकोण बरोबर छपाकमध्ये आपली छाप पाडली आहेत तर श्वेता त्रिपाठीनं मिर्जापूर, फोर मोर शॉट्स सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची ओळख करुन दिली आहे. कोरोना आणि लॉकडाऊन काळात नेटफ्लिक्स माध्यमानी मोठा दिलासा दिला आहे. बॉलिवूड, टॉलिवूड आणि हॉलिवूडचे अनेक चांगले चित्रपट रिलीजसाठी नेटफ्लिक्सवर रांगेत उभे आहेत. त्यापैकी कार्गो हा रिलीज झालेला हा एक वेगळा चित्रपट…नक्की बघण्यासारखा…