Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Bigg Boss Marathi 6 घरात होणार होणार शॉकिंग एलिमिनेशन; ‘या’

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

टेम्पो ते मर्सिडीज व्हाया नाटक

 टेम्पो ते मर्सिडीज व्हाया नाटक
कहानी पुरी फिल्मी है

टेम्पो ते मर्सिडीज व्हाया नाटक

by रश्मी वारंग 21/10/2020

कोणतीही कला जोपासणं सोपं काम नाही. कला सांभाळता सांभाळता खूप काही होऊ शकतं. आयुष्य बदलू शकतं.

सुप्रसिद्ध नाट्यचित्रपट अभिनेते मोहन जोशी यांच्याबाबतीत घडलं तसं.

१९८३च्या आसपास मोहन‌ जोशी यांनी उमदा कलाकार म्हणून पुण्यात नाव कमवायला सुरुवात केली होती. त्यांची नाटकं गाजत होती. त्याचवेळी “किर्लोस्कर” कंपनीतील नोकरी सांभाळण्याची कसरतही त्यांना करावी लागत होती. नुकतंच लग्न झाल्याने नोकरी सोडणं शक्य नव्हतं आणि नाटकावरच्या प्रेमापायी नाटकाचे प्रयोग करणंही जोरात सुरू होतं.

अशा कसोटीच्या काळात त्याच्या नाटकाचा कोकण दौरा सुरू झाला. सलग २८ प्रयोग होणार होते. नाटकासाठी इतकी रजा मिळणं शक्य नव्हतं. मोहन जोशींनी आजी वारल्याची थाप मारुन तिच्या तेराव्यानंतर कामावर रुजू होऊ असा अर्ज दिला.

२८ दिवसांचा नाटकाचा दौरा म्हणजे सगळी पळापळ होती. प्रयोग, जागरणं, प्रवास या गडबडीत आपण आधीच अर्ज पाठवलाय हे विसरुन मोहन जोशी यांनी परत रजेचा अर्ज पाठवला. नाटकाचा दौरा संपवून ते परत कामावर रुजू झाले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलावणं धाडलं. त्यांच्या कार्यालयात शिरताच मोहन जोशींना प्रश्न विचारला गेला.

“तुम्हाला नक्की आज्या किती”?

परिस्थितीचा अंदाज घेत मोहन जोशी यांनी उत्त्तर दिलं.”सर्वांना असतात तशा माझ्याही दोन आज्या आहेत. आईची आई.वडिलांची आई.”

साहेबांनी तीक्ष्ण नजरेने विचारलं. “नक्की का? कारण आजी वारल्याचे तीन अर्ज आहेत तुमचे”. मोहन जोशींनी आजीची बहीण म्हणजे आजीच वगैरे सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण साहेबांनी ठामपणे सांगितलं, “तुम्ही खोटं‌ बोलत आहात तुम्हालाही माहितेय. कंपनी तुमच्यासाठी इतकं करते. तुम्ही जर कंपनीसाठी काही करु शकत‌ नसाल तर नोकरी सोडणंच इष्ट होईल.”

…आणि मग त्याच कार्यालयातील मदततत्पर साळवी साहेबांनी पूर्ण सहकार्याची खात्री दिल्यावर मोहन जोशी यांनी नोकरी सोडून ट्रॅव्हलिंगच्या व्यवसायात उडी घेतली. त्यासाठी त्यांनी टेम्पो खरेदी केला. किर्लोस्कर कंपनीच्याच सामानाची वाहतूक करण्याचं ते काम होतं.पण नोकरीचं बंधन नसल्याने नाटक करणंही शक्य होतं. एक दिवसाआड पुणे बेळगाव प्रवास करत जोशी यांनी नाट्यप्रयोगसुद्धा सांभाळले.

त्यामुळेच थॅन्क यु मिस्टर ग्लाड, तरुण तुर्क म्हातारे अर्क, कुर्यात सदा टिंगलम, श्री तशी सौ, नातीगोती, मी रेवती देशपांडे, सुखान्त, बुढ्ढा होगा तेरा बाप अशा जवळपास ५० नाटकांतून मोहन जोशी यांचा सदाबहार अभिनय नाट्यरसिकांना पहाता आला.

नाटककला जोपासण्यासाठी तो नाट्यप्रेमाचा कीडाच अंगी असावा लागतो. तो‌ असला की, मग वाटेल ते कष्ट घेण्याची तयारी कलाकार दाखवतोच आणि प्रसंगी त्याचं फळही मिळतं. नोकरी सोडून जोशी यांनी ज्या ठिकाणाहून टेम्पो घेतला त्याच कंपनीतून मर्सिडीज विकत घेण्याचे भाग्यही त्यांनी अनुभवले.

हा टेम्पो ते मर्सिडीज प्रवास साक्ष देतो सच्च्या कलाकाराच्या मेहनतीची! जिद्दीची आणि कलेवरच्या प्रेमाचीही..

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood Entertainment marathi movies Theatre
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.