Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

नवसंजीवनीचा संदेश देणारा ‘लाईफलाईन’चित्रपटाचे प्रेक्षकांकडून होतय कौतुक…

 नवसंजीवनीचा संदेश देणारा ‘लाईफलाईन’चित्रपटाचे प्रेक्षकांकडून होतय कौतुक…
Lifeline Marathi Movie 2024
मिक्स मसाला

नवसंजीवनीचा संदेश देणारा ‘लाईफलाईन’चित्रपटाचे प्रेक्षकांकडून होतय कौतुक…

by Team KalakrutiMedia 05/08/2024

आधुनिक विज्ञान आणि परंपरा यांच्यातील संघर्ष दाखवणारा, ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘लाईफलाईन‘ चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून अवयवदानावर एका अनोख्या पद्धतीनं भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांची वाहवा मिळवण्यात यशस्वी झाला आहे. प्रेक्षकांकडून, अनेक प्रख्यात डॉक्टरांकडून या चित्रपटाचे, दिग्दर्शकाचे कौतुक होत आहे. अवयवदानासारखा संवेदनशील विषय अतिशय उत्तमरित्या पडद्यावर मांडण्यात आले आहे. डॉक्टर आणि किरवंतामधील ही संघर्षमय लढाई असून अवयवदानाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली तर आपला उदरनिर्वाह कसा चालणार, या विचारसरणीचे किरवंत आहेत. हेच विचार बदलणारा हा चित्रपट आहे.(Lifeline Marathi Movie 2024)

Lifeline Marathi Movie 2024
Lifeline Marathi Movie 2024

वैशिष्टय म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शक साहिल शिरवईकर यांनी अवयवदानाबद्दल केवळ जागरूकताच पसरवली नसून याची सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली आहे. त्यांनी अधिकृतरित्या अवयवदानची प्रक्रिया पूर्ण केली असून ही प्रक्रिया फक्त त्यांनीच नाही तर माधव अभ्यंकर आणि चित्रपटाच्या टीममधील अनेकांनी केली आहे. 

Lifeline Marathi Movie 2024
Lifeline Marathi Movie 2024

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक साहिल शिरवईकर म्हणतात, ” प्रेक्षकांचे हे प्रेम पाहून खूप आनंद होतोय. दक्षिण मुंबईसारख्या भागातही या चित्रपटगृहाबाहेर ‘हाऊसफूल’ चे बोर्ड्स ही दिसत आहेत. अवयवदान हा खरोखरच खूप गंभीर विषय आहे आणि लोकांमध्ये याविषयीचे गैरसमज दूर करणे खूप आवश्यक आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून हा विषय अतिशय प्रभावीपणे अनेकांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे माझ्या पहिल्याच चित्रपटाचा विषय मी हा घेतला. आमच्या संपूर्ण चित्रपटाच्या टीमने अवयवदानाची प्रतीज्ञा केली आहे. मला खात्री आहे, हा चित्रपट पाहून प्रेक्षक भारावून जातील.”(Lifeline Marathi Movie 2024)

===========================

हे देखील वाचा: ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ मालिकेने केला ६०० भागांचा टप्पा यशस्वीरीत्या पार!

===========================

‘लाईफलाईन’ची कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहेत. तर या चित्रपटात अशोक सराफ, माधव अभ्यंकर यांच्यासह हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. अशोक पत्की यांचे संगीत लाभलेल्या या चित्रपटातील गाणी अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायली आहेत. लालजी जोशी, कविता शिरवईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रिसेंडो एंटरटेनमेंट चित्रपटाचे निर्माते आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Actor Madhav Abhyankar ashok saraf ashok saraf movie Celebrity Entertainment Lifeline Marathi Movie 2024 Marathi Movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.