Madam Sapna Teaser: मोठ्या पडद्यावर दिसणार डांसर सपना चौधरी च्या संघर्षाची कहानी; महेश भट्ट बनवणार ‘मॅडम सपना’ बायोपिक
हरियाणवी डान्सर सपना चौधरीला आजच्या काळात परिचयाची गरज नाही. सपना चौधरी आपल्या अनोख्या स्टाईलमुळे सतत लक्ष वेधून घेते. तिच्या देसी हरियाणवी नृत्याला जगभरात प्रसिद्धी मिळाली आहे. सपना चौधरीचं आयुष्य अनेकांना चकचकीत वाटत असलं तरी लहानपणापासून हे स्थान मिळवण्यासाठी तिला कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागले, हे तुम्ही तिच्या बायोपिकमधूनच जाणून घेऊ शकता. सपना चौधरीने महेश भट्ट प्रस्तुत टीजर शेअर करत तिच्या बायोपिकची घोषणा केली आहे.सपना चौधरीचं प्रसिद्ध गाणं ‘तेरी अंखी का यो काजल’ आजही लग्न आणि पार्ट्यांमध्ये ऐकायला मिळतं. सपनाच्या डान्सचे कोट्यवधी चाहते आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी नेहमीच आतुर असतात.( Dancer Sapna Chaudhary Biopic)
सेलेब्सच्या बायोपिकच्या यादीत आता हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीचे नाव समाविष्ट झाले आहे. 4 सप्टेंबर रोजी सपनाच्या आयुष्यावर बनणाऱ्या मॅडम सपना (Madam Sapana) या चित्रपटाची घोषणा निर्मात्यांनी केली आहे. चित्रपटाच्या घोषणेसोबतच त्याचा लेटेस्ट टीझर व्हिडिओही समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीच्या बायोपिकची बरीच चर्चा रंगत होती. अखेर ती वेळ आली जेव्हा ‘मॅडम सपना’ या तिच्यावर आधारीत असलेल्या चित्रपटाची घोषणा झाली. या व्हिडिओमध्ये सपनाच्या संघर्षमय जीवनाची झलक पाहायला मिळणार आहे. आणि या चित्रपटाची निर्मिती महेश भट्ट करत असून पुढील वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
‘मॅडम सपना’ सिनेमाची झलक स्व:तहा सपना चौधरीने तिच्या सोशल मिडियावर शेअर केली आहे आणि त्याबरोबर लिहिले आहे की, ”हा बायोपिक केवळ एक चित्रपट नाही-हे माझ्या संघर्षाचे, स्वप्नांचे आणि मी पार केलेल्या मार्गाचे प्रतिबिंब आहे. प्रत्येक आव्हानात तुमची साथ हीच माझी ताकद आहे. माझी कथा पडद्यावर येत असल्याने मला तुमच्या प्रेमाची आणि प्रोत्साहनाची अधिक गरज आहे.”(Dancer Sapna Chaudhary Biopic)
===========================
===========================
सपना चौधरीच्या आयुष्यावर आधारीत ‘मॅडम सपना’ या बायोपिक सिनेमाची निर्मिती महेश भट्ट करत असून हा सिनेमा पुढच्या वर्षी म्हणजेच 2025 साली आपल्या समोर दाखल होणार आहे.