Crew 2 चित्रपटाची तयारी सुरु; पुन्हा ३ अभिनेत्रींचं त्रिकुट धम्माल

स्त्री आणि भेड़ियाच्या जगात नवीन सुपरहिरो Thama ची एन्ट्री!
बॉलिवूडचं हॉरर-कॉमेडी युनिवर्स (Horror-Comedy Universe) दिवसेंदिवस मोठं होत चाललं आहे… श्रद्धा कपूर हिची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘स्त्री’ (Stree movie) चित्रपटाने मॅडॉक फिल्म्सने हे युनिवर्स सुरु केलं होतं, आणि आता हा प्रवास ‘थामा’ चित्रपटापर्यंत येऊन ठेपला आहे… नुकताच Thama चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून ‘स्त्री’, ‘भेडिया’ आणि ‘सरकटा राक्षस’च्या सोबतच आणखी एक महत्वाचं पात्र प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे… आयुष्यमान खुराना आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘थामा’ चित्रपटात प्रेक्षकांना नवा आतंक पाहायला मिळणार आहे…

‘थामा’ चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या डायलॉगने होते. आणि त्यानंतर आयुष्मान खुरानाची धमाकेदार एंट्री होते. या चित्रपटात आयुष्यमान आणि रश्मिका यांची आजवर कधीच न पाहिलेली रॉमेंटिक प्रेमकथा एका महत्वाच्या ट्विस्टसह पाहता येणार आहे… चित्रपटात परेश रावल हे आयुष्मानच्या वडिलांच्या भूमिकेत दिसत आहेत. आता नेमकी ही प्रेमकथा काय असणार? आणि चित्रपटाशी स्त्री, भेडिया, सरकटा एकमेकांशी कसे जोडलेले असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे… (Thama movie trailer)
====================================
हे देखील वाचा : Stree to Thama : बॉलिवूडचं हॉरर-कॉमेडी युनिवर्स!
====================================
दरम्यान, ‘थामा’ चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार (Aditya Sarpotdar) यांनी केले आहे.. ‘मुंज्या’ (Munjya) चित्रपटानंतर आदित्य मॅडॉकसोबत हा दुसरा चित्रपट करत आहेत… या चित्रपटात प्रेक्षकांना ‘भेड़िया’ आणि ‘स्त्री’ची झलक देखील अनुभवायला मिळणार आहे… आयुष्यमान खुराना, रश्मिका मंदाना, नवाजुद्दीन सिद्दीकी, परेश रावल यांच्या प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट २१ ऑक्टोबर २०२५ रोजी थामा देशभरात रिलीज होणार आहे… (Ayushmann Khurrana and Rashmika Mandanna)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi