
Thama : ‘खूनी प्रेम कहानी…; आयुष्मान खुराना आणि नवाजुद्दीन सिद्दीकीचा अनोखा थरार!
‘स्त्री’, ‘भेडिया’ असे बेस्ट हॉरर कॉमेडी (Horror-Comedy Universe) चित्रपट बनवत मॅडॉक फिल्म्सने हॉरर-कॉमेडी चित्रपटांचा युनिवर्स तयार केलं आहे… आणि आता या युनिवर्समध्ये ‘थामा’ चित्रपट सामिल झाला आहे… आयुश्यमान खुराना आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाची पहिली झलक नुकतीच प्रदर्शित झाली असून १०० वर्ष अपूर्ण राहिलेली रक्तरंजित प्रेमकथा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.. मॅडॉक फिल्म्सने आतापर्यंत ‘स्त्री’, ‘स्त्री २’, ‘भेडिया’ आणि ‘मुंज्या’ यांसारखे हॉरर कॉमेडी चित्रपट बनवले आहेत… आणि आता यात सामिल झालेला ‘थामा’ जरा वेगळा आहे कारण यात एक प्रेमकथा दाखवली जाणार आहे…(Thama Teaser)

‘थामा’ च्या टीझरची सुरुवात आयुष्मान खुराणाच्या पात्राने अर्थात आलोकच्या आवाजाने होते. तो तारकाला म्हणजेच रश्मिका मंदानाला विचारतो, “तू माझ्याशिवाय १०० वर्षे जगू शकशील का?”, यावर ती उत्तर देते १०० वर्षे काय, एका क्षणासाठीही नाही. आणि मग रश्मिका मंदाना एका भयानक लूकमध्ये समोर येते… ‘मुंज्या’ (Munjya) नंतर मॅडॉक फिल्म्ससोबत दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा हा दुसरा चित्रपट असून पुन्हा एकदा प्रेक्षकांना थिएटरमध्ये अनोखी कथा पाहायला मिळणार आहे…
================================
हे देखील वाचा : जागर ‘स्त्रीशक्ती’चा: वेबसिरीजेस गाजवणाऱ्या खास व्यक्तिरेखा
=================================
विशेष म्हणजे या हॉरर-कॉमेडी चित्रपटात पहिल्यांदाच नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawajuddin Siddiqui) खलनायकाची भूमिका साकारणार असल्यामुळे प्रेक्षकांना विशेष उस्तुकता लागली आहे…’थामा’ हा चित्रपट २०२५ च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेला स्त्री, भेडिया यांची कथा किंवा पात्रांचा एकमेकांशी संबंध दाखवण्यात आला होता… आता ‘थामा’ मध्येही आधीच्या चित्रपटांचं कनेक्शन असणार हा हे पाहणं महत्वाचं असमार आहे…लवकरच ‘थामा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून सध्या समोर आलेल्या चित्रपटाच्या टीझरमध्ये आयुश्यमान खुराना, रश्मिका मंदाना, परेश रावल आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi