Madhugandha Kulkarni मधुगंधा कुलकर्णीने केले, हेमंत ढोमेच्या ‘फसक्लास दाभाडे’चे भरभरून
Madhugandha Kulkarni मधुगंधा कुलकर्णीने केले, हेमंत ढोमेच्या ‘फसक्लास दाभाडे’चे भरभरून कौतुक
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे‘ हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. बहुप्रतीक्षित चित्रपट म्हणून ‘फसक्लास दाभाडे‘ (Fussclass Dabhade) सिनेमाची मागील काही दिवसांपासून कमालीची चर्चा होती. भावाबहिणांच्या अतिशय वेगळ्या मात्र भावनिक नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत असून, प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया सिनेमाच्या टीमला आनंद देताना दिसत आहे. (Madhugandha Kulkarni)
अभिनेता अमेय वाघ, राजसी भावे, सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर, क्षिती जोग, हरीश दुधाडे, निवेदिता सराफ, राजन भिसे अशी दमदार स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाचे कौतुक तर नेटकरी आणि प्रेक्षक करत आहेच मात्र इंडस्ट्रीमधील कलाकार देखील सिनेमा पाहून खूपच खुश झाले आहे. सिनेमाने या कलाकारांना देखील भुरळ घातली आहे. अनेक कलाकारांनी सिनेमाचे कौतुक करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. अशातच अभिनेत्री, लेखिका आणि निर्माती असलेल्या मधुगंधा कुलकर्णीने देखील सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत हेमंत ढोमे आणि सिनेमाच्या टीमचे कमालीचे कौतुक केले आहे. (Madhugandha Kulkarni)
मधुगंधाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “काल फसक्लास दाभाडे पाहिला या विषयाच्या निवडीसाठी हेमंत आणि क्षितीचं मनापासून अभिनंदन! तुमचा आमचा विषय , घरचा तरी ; धाडसाचा! व्यक्तिशः मला खूप चित्रपट खूप आवडला! कुटुंब एक असलं तरी त्यात वेगळी माणसं असतात, नात्यांचा इतिहास असतो. एकच घटना कुटुंबातल्या वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळा परिणाम करून जाते .नाती बदलतात…तुटतात ..सुटतात, गाठी बसतात. थोडं सुख , थोडा आनंद, काही आठवणी घेवून आपण मोठे होतो ,बदलतो, तरी जोडलेलो राहतो कुटुंबाशी ! (Marathi Top News)
A post shared by Madhugandha Kulkarni (@madhugandhakulkarni)
अशीच गोष्ट आहे फस क्लास दाभाडेची. स्क्रीनप्ले वर लेखकाची पकड जाणवते. खुसखुशीत संवाद संपूर्ण चित्रपटभर आपल्या चेहऱ्यावर एक स्माईल ठेवतात. उत्तम दिग्दर्शन. हेमंतने व्यावसायिकतेच भान ठेवून जे म्हणायचं आहे, जे सांगावस वाटतं म्हणून आपण चित्रपट करतो ते अत्यंत कल्पकतेने आणि रंजन करत सांगितलेलं आहे. उषाताई , निवेदिता ताई , राजन सर, क्षिती, सिद्धार्थ , हरीश, अमेय, मिताली अश्या एक से एक सरस मंडळींनी अप्रतिम कामं केली आहेतच पण ह्या सगळ्यांमध्ये नवीन असूनही राजसी भावे, तृप्ती शेडगे यांनीही कमाल केली आहे .
Performences outstanding! Cinematographer सत्याने आम्हाला दाभाडे फॅमिली मध्ये नेवून ठेवलं.
आपल्या समोर घडत आहे असं वाटतं. गाणी गुणगुणत मी बाहेर पडले … येलो येलो…आणि मनाला लायटिंग…ही दोन गाणी रेंगाळत राहतात . कपडे सुंदर दिसण्यासाठी नसून …खरी पात्र वाटावीत या साठी आहेत हे कळतं. सगळं चांगलं जुळून आलं की चित्रपट रंजक आणि चांगला होतो…तसा हा झाला आहे. रंजन करत असताना विचार सुद्धा करायला लावणारी जी मोजकी मंडळी आहेत त्या मध्ये हेमंत आणि क्षितीचं नाव महत्वाचं आहे.
मराठी माणूस , मराठी प्रेक्षक म्हणून अत्यंत महत्वाची गोष्ट अशी की,एखाद्याला एखादा सिनेमा आवडतो ,एखाद्याला नाही आवडत. वैयक्तिक आवडी निवडी असतातच पण आपण आपलं मत सिनेमा बघून बनवाव. समीक्षा ही तटस्त असायला हवी, बरेचदा ती नसते . चित्रपट , चित्रपटगृहात असताना, त्या सिनेमाला, दिग्दर्शकाला झोडून काढणं , त्याबद्दल वाईट लिहून बोलून मराठी प्रेक्षक तुटतो ..
======
हे देखील वाचा : Ankush Chaudhari प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अंकुश चौधरी बनला मराठी सिनेसृष्टीतील हँडसम अभिनेता
Preity Zinta उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच हुशार बिसनेसवूमन आहे ‘डिंपल गर्ल’ प्रीती झिंटा
======
आपल्या मातीतल्या गोष्टी मोठ्या पडद्यावर आल्या पाहिजेत…ॲनिमल आणि पुष्पा असे आपले हिरो गोष्टी आहेत का ? आपल्याकडे scale नाही कारण तेवढा प्रेक्षकवर्ग नाही सुधारणा सिनेमामध्येपण झाली पाहिजे पण त्यासाठी आपला प्रेक्षक वर्गही वाढला पाहिजे हेच सत्य आहे. आपण sounth सिनेमांचे, त्यांच्या scaleचे दाखले देताना त्यांच्या प्रेक्षकांची चित्रपटांवरची अपार श्रद्धा विसरतो ! तर , फस क्लास दाभाडे अवश्य बघा!”
दरम्यान मधुगंधा कुलकर्णीची ही पोस्ट कमालीची व्हायरल होत आहे. यात तिने टीमचे आणि कलाकारांचे केलेले कौतुक अगदीच योग्य असल्याचे नेटकाऱ्यानी कमेंट्समध्ये म्हटले आहे. मधुगंधा ही उत्तम लेखिका असून, तिने आतापर्यंत अनेक गाजलेल्या चित्रपटांचे लेखन केले आहे. नाच ग घुमा, मु. का. पोस्ट बोंबीलवाडी हे तिचे गाजलेले सिनेमे आहेत.