Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Fashion Movie : ‘फॅशन’ चित्रपटाचा तो सीन पॅरिसमध्ये शूट होणार होता, पण….
स्त्री पात्र केंद्रस्थानी ठेवून चित्रपटाची कथा मांडणारे दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या जीवनातील माईलस्टोन चित्रपट म्हणजे फॅशन. १७ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट फॅशन आणि मॉडेलिंग इंडस्ट्रीबद्दल अगदी खोलवर जाऊन भाष्य करतो. आज ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फॅशन हा चित्रपट रि-रिलीज करण्यात आला. जाणून घेऊयात चित्रपटाबद्दल…(Fashion Movie)
‘फॅशन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मधुर भांडारकर यांनी केले होते. फॅशन इंडस्ट्री नेमकी काय आहे? त्या ग्लॅमरस जगात कायमचं टिकून राहण्यासाठी, काम मिळण्यासाठी आणि लोकांच्या नजरेत राहण्यासाठी काय काय करावं लागतं याचं सत्य हा चित्रपट मांडतो. चित्रपटाची सगळी जबाबदारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या खांद्यावर असून तिला Kangana Ranaut, मुग्धा गोडसे यांनीही उत्तम साथ दिली. (Re-release trend)

‘फॅशन’ या चित्रपटात लहानशा गावातून शहरात येत सुप्रसलिद्ध मॉडेल होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणीची कथा दाखवली आहे. फॅशन शोजची शो स्टॉपर होण्यासाठी एखाद्या मॉडेलचा खडतर प्रवास कसा असतो किंवा Established Model ला मागे टाकून पुढे जाण्याची ट्रिक काय असते असं सगळं वास्तववादी मॉडेल्सचं जगणं फॅशन सांगून जातो. (Bollywood movie update)
प्रियांका चोप्रा आणि कंगना राणावत या दोघींच्याही अभिनय कारकिर्दीतील ‘फॅशन’ (Fashion movie) हा चित्रपट खरा माईलस्टोन ठरला आहे. या दोन्ही अभिनेत्रींनी त्यांच्या अभिनयातील दाखवलेली वर्सटॅलिटी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. वास्तववादी चित्रपट बनवण्यात मधुर भांडारकर यांचा हातखंडा आहेच पण त्याच्या दिग्दर्शनाला प्रियांका आणि कंगनाच्या अभिनयाची साथ लाभल्यामुळे फॅशन चित्रपट आयकॉनिक नक्कीच आहे.
===============================
हे देखील वाचा : Priyanka Chopra : मिस वर्ल्ड जिंकण्यासाठीच ‘ती’ आली होती!
==============================
रिअल लोकेशन्स शूट करण्यासाठी मधुर भांडारकर यांना ओळखलं जातं. फॅशन चित्रपटाबाबतीतही शुटचा एक किस्सा आहे. तर, चित्रपटात प्रियांका चोप्रा पॅरिस फॅशन विकसाठी रॅम्पवॉक करते असा सीन होता जो मधुर यांना पॅरिसमध्ये आयफेल टॉवरच्या बॅकड्रॉपवर शूट करायचा होता .पण काही कारणास्तव ते न जमल्यामुळे चित्रपटात खऱ्या फॅशन शोचं फुटेज दाखवण्यात आलं आहे.

२००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फॅशन’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तेव्हा २६.५ कोटी कमावले होते. आणि आता हिंदी चित्रपटसृष्टीत सुरु असलेल्या रि-रिलीज ट्रेण्डमध्ये आणखी एका कल्ट फॅन फॉलोईंग आणि नोस्टेलॅजिया असणारा फॅशन रि-रिलीज करण्यात आला आहे. फॅशनच्या निमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा एकदा आपल्या आवडीच्या चित्रपटाचा आनंद थिएटरमध्ये जाऊन लुटता येणार यात शंकाच नाही. (Bollywood masala)