Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Madhuri Dixit : २३ वर्षांपूर्वी आलेल्या ‘त्या’ चित्रपटातील गाणं शुट व्हायला लागलेले १६ दिवस
जिची अदाकारी, नृत्य आणि अभिनय पाहून सगळेच मोहित होतात अशा माधुरी दीक्षितचा (Madhuri dixit) आज (१५ मे) वाढदिवस. अबोध चित्रपटापासून नकळतपणे सुरु झालेला तिचा प्रवास आजही अविरतपणे सुरु आहे. माधुरी दीक्षित उत्तम अभिनेत्री तर आहेच पण त्याहूनही जास्त तिचे चाहते तिच्या डान्सवर फिदा आहेत. माधुरीच्या गाण्यातील प्रत्येक हुक स्टेप आजही आपल्याला लक्षात आहेत. असंच २३ वर्षांपूर्वी आलेल्या एका चित्रपटातील गाणं होतं ज्याचं शुटींग तब्बल १६ दिवस सुरु होतं. जाणून घ्या हा किस्सा… (Madhuri dixit birthday special)

तर, माधुरी दीक्षितने शाहरुख खानसोबत (Shah rukh khan) बरेच चित्रपट केले. पण त्यात २००२ साली संजय लीला भन्साळी (Sanjay leela Bhansali) यांनी दिग्दर्शित केलेला ‘देवदास’ 9Devdas) चित्रपट विशेष करुन गाजला आणि प्रेक्षकांच्या कायम लक्षातही राहिला. खरं तर हा चित्रपट मल्टिस्टारर होता. शाहरुख खान, माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय (AIshwerya Rai), जॅकी श्रॉफ, स्मिता जयकर असे दिग्गज कलाकार या चित्रपटात होते. चित्रपटातील प्रत्येक गाणी अप्रतिम होतीच पण डोला रे डोला हे गाणं खास होतं. त्याचं कारण असं की बॉलिवूडच्या दोन क्वीन्स ऐश्वर्या आणि माधुरी यांनी एकत्रित या गाण्यावर नृत्य केलं होतं. (Bollywood gossips)

२००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या देवदास चित्रपटातील माधुरी आणि ऐश्वर्यावर चित्रित झालेलं डोला रे डोला हे गाणं शुट होण्यासाठी चक्क १६ दिवस लागले होते. बॉलिवूडच्या दोन ग्लॅमरस अभिनेत्रींना एकत्र पाहण्याची इच्छा भन्साळींनी पुर्ण करत त्यांना ‘डोला रे डोला’ )Do;a RE Dola) या गाण्यातून चाहत्यांना एक कायमस्वरुपी आठवणही दिली होती असं नक्कीच म्हणावं लागेल. (Bollywood tadaka)
‘देवदास’ चित्रपट २००० साली आलेल्या अनेक चित्रपटांपैकी सर्वोत्कृष्ट चित्रपट होता. विशेष म्हणजे माधुरी दीक्षितच्या या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. डोला रे डोला या गाण्याने देखील नवा इतिहास रचला होता. महत्वाचं म्हणजे यूकेच्या ‘ईस्टर्न आय’ या वृत्तपत्रानं जनमत, सिनेमेटिक इफेक्ट, कोरिओग्राफी आणि एकूण प्रभाव लक्षात घेऊन या गाण्याला बॉलिवूडच्या टॉप ५० गाण्यांमध्ये पहिला क्रमांक दिला आहे.(Entertainment news)
================================
हे देखील वाचा: जेव्हा माधुरी दीक्षित आणि ऋषी कपूर पुणे स्टेशनवर बुरखा घालून अवतरले!
=================================
माधुरी दीक्षितच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर आजवर ‘जमाई राजा’, ‘खेल’, ‘स्वाती’, ‘राम लक्खन’, ‘याराना’, ‘संगीत’, ‘त्रिदेव’, ‘दिल तो पागल है’, ‘हम आपके है कौन’, अशा अनेक चित्रपटांमध्ये माधुरीने versatile भूमिका साकारल्या.. तिच्या वाढदिवसानिमित्त कलाकृती मीडियाकडून तिला अनेक शुभेच्छा! (Madhuri dixit movies)