Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Madhuri Dixit-Sanjay Dutt Affair : “तू त्याच्यापासून लांब राहिलेलीच बरी!”; वडिलांनीच लव्हस्टोरीला लावलेला पुर्णविराम?
बॉलिवूड कलाकारांच्या चित्रपटांची किंवा त्यांच्या भूमिकांची जितकी चर्चा होत नाही त्यापेक्षा जास्त त्यांचं कुणाशी अफेअर आहे किंवा होतं… किंवा मग कोणत्या कलाकाराचा घटस्फोट झाला आहे याची चर्चा सुरु असते… तसं, पाहायला गेलं तर इंडस्ट्रीत बऱ्याच जणांची अफेअर्स गाजली… त्यापैकी एक नाव म्हणजे माधुरी दीक्षित आणि संजय दत्त… १९८१ मध्ये ‘रॉकी मेरा नाम’ चित्रपटातून संजयने बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. ‘रॉकी’ चित्रपटामुळे त्याला प्रेक्षकांचं प्रेम आणि बॉक्स ऑफिसवर यश दोन्ही मिळालं… दुसरीकडे माधुरी दीक्षितही आपल्या नृत्य आणि अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकत होतीच.. अशातच दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या… ‘खलनायक’ (Khalnayak movie)च्या शूटिंदरम्यान माधुरी व संजय यांच्यात जवळीक आणखी वाढली. मात्र, हे नातं कधीच लग्नापर्यंत पोहोचलं नाही… असं म्हटलं गेलं की माधुरी दीक्षितच्या वडिलांनी तिला संजय दत्त पासून दुर केलं होतं… काय आहे हा किस्सा जाणून घेऊयात…(Sanjay Dutt & Madhuri Dixit affair)

ज्येष्ठ पत्रकार पूजा सामंत यांनी ‘हिंदी रश’च्या पॉडकास्टमध्ये संजय दत्त आणि माधुरी दीक्षितच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे… १९९३ च्या बॉम्बस्फोटादरम्यान बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला दोषी ठरवण्यात आल्यावर माधुरीच्या वडिलांनी तिला त्याच्यापासून दूर केलं होतं… पूजा म्हणाली की, “माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्यातील जवळीक वाढत असल्याच्या चर्चा त्याकाळी सर्वत्र सुरु होत्या… त्या दोघांचे एकत्र चित्रपट आले, त्यांना बॉक्स ऑफिसवर यश ही मिळालं… पुढे, १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात संजयचं नाव समोर आलं होतं,आणि त्यानंतर एक गोष्ट माझ्या कानावर आली होती. तेव्हाचे प्रसिद्ध फोटोग्राफर होते त्यांनी मला ही गोष्ट सांगितली होती. माधुरीला तिच्या वडिलांनीच संजय दत्तपासून वेगळं केलं.”(Bollywood affiars)

पूजा पुढे म्हणाल्या की, “माधुरीच्या वडिलांनी तिला समजावलं होतं की, हे तुझ्यासाठी योग्य नाहीये. आज हा अभिनेता अशा सगळ्या गोष्टींमध्ये अडकलाय तर भविष्यात तो चांगला नवरा होईल याची शाश्वती काय आहे? त्यामुळे तू या सगळ्या गोष्टींपासून लांब राहा. आणि माधुरीच्या वडिलांचा तो निर्णय योग्य ठरला.” (Entertainment News)
“या घटनेनंतर माधुरीला तिच्या कुटुंबाने अमेरिकेला नेलं… आणि मग काही वर्षांनी डॉ. श्रीराम नेनेंसोबत माधुरीचं लग्न झालं… त्यांचा संसार सुखाचा झाला आणि यामागे अभिनेत्रीच्या कुटुंबीयांचं खूप मोठं योगदान आहे. योग्यवेळी योग्य निर्णय घेतल्याने आयुष्य कसं बदलतं हे तिच्या घरच्यांनी सिद्ध करून दाखवलं. आता माधुरी आणि संजय दत्त यांचं नेमकं काय होतं हे मलाही माहीत नाही. त्यांचे चित्रपट चालले, हो जवळीक होती या चर्चा नक्कीच होत्या. पण, तिने संजय दत्तबरोबर जास्त काम करू नये, हे नातं पुढे जाऊ नये यासाठी अभिनेत्रीच्या वडिलांनी लक्ष ठेवलं होतं. तिला वेगळं होण्यास सांगितलं होतं,” असं पूजा यांनी सांगितलं…
================================
=================================
माधुरी आणि संजय यांनी एकत्र ‘जय देवा’, ‘खतरों के खिलाडी’, ‘खलनायक’, ‘महंता’, ‘इलाका’, ‘थानेदार’, ‘साजन’, ‘कलंक’ या चित्रपटांमध्ये कामं केली… त्यांनी फार चित्रपट जरी एकत्र केले नसले तरी प्रत्येक चित्रपट आजही प्रेक्षकांना लक्षात आहेत… सध्या दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर नुकताच संजय दत्त याचा ‘बागी ४’ (Baaghi 4) चित्रपट रिलीज झाला… तर, माधुरी दीक्षितचा मिसेस देशपांडे (Mrs. Deshpande) ही थ्रिलर वेब सीरीज लवकरच भेटीला येणार आहे… कलंक चित्रपटानंतर पुन्हा माधुरी आणि संजय दत्त एकाच चित्रपटात दिसावे ही त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा पुर्ण होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi