Super Duper Movie Poster ने वाढवली उत्सुकता; उन्हाळ्यात अनुभवता येणार

Madhuri Dixit आणि श्रीराम नेनेंची क्युट लव्हस्टोरी!
अदाकारी, सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांना घाळाळ करणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)… तिला डान्समध्ये कुणी मात देऊच शकत नाही हे आता पक्कं झालं आहे… तर अशा या आपल्या स्मितहास्य असणाऱ्या धकधक गर्लचा आज लग्नाचा वाढदिवस… बॉलिवूडमध्ये एकेकाळी टॉपवर असणाऱ्या माधुरीने अचानक लग्नाचा निर्णय घेतला आणि तिच्या चाहत्यांच्या ह्रदय तुटलं… डॉ. श्रीराम नेनेंशी (Dr Shreeram Nene) लग्नगाठ बांधल्यानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या माधुरीची लव्हस्टोरी आहे तरी कशी जाणून घेऊयात…

तर, माधुरी दीक्षित एकदा लॉस एंजेलिसला तिच्या भावाला भेटायला गेली होती आणि तिथेच तिची भेट श्रीराम नेनेंशी झाली. आश्चर्याची बाब म्हणजे तेव्हा माधुरी भारतात सुपरस्टार आहे हे श्रीराम यांना माहिती नव्हतं… माधुरीच्या भावामुळे त्यांची भेट झाली गंमत म्हणजे पहिल्याच भेटीत दोघे एकमेकांचे चांगले मित्र झाले आणि त्यानंतर डॉ. नेनेंनी डोंगरदऱ्यांमध्ये बाईक राईडला येणार का? असं माधुरीला विचारलं… माधुरीने होकार दिला आणि तिथूनच त्यांच्या नव्या प्रवासाची सुरुवात झाली… (Madhuri Dixit & Shreeram Nene love story)
================================
================================
दरम्यान, माधुरीने एका मुलाखतीत एकदा म्हटलं होतं की, पती – पत्नी दोन भिन्न व्यक्ती असतात. त्यामुळे व्यक्तिमत्वात अंतर असणं सामान्य आहे. पण आपलं नातं जपण्यासाठी प्रेम जपणं महत्त्वाचं आहे आणि झालेल्या मतभेदांवर काम करणंही महत्त्वाचं आहे. दोघांचा आदर राखून नातं आणि प्रेम राखण्यास मदत होते आणि म्हणूनच या दोघांचं प्रेम आज २६ वर्ष होऊनही कायम आहे आणि दोघांचा सुखी संसार आहे… अलीकडेच माधुरी भूल `भूलैय्या ३’ (Bhool Bhulaiya 3) मध्ये दिसली होती… आणि लवकरच माधुरी तृप्ती डिमरी सोबत ‘माँ-बहन’ चित्रपटात दिसणार आहे… (Madhuri Dixit movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi