
Dil To Pagal Hai : राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट होणार Re-Release
हिंदी चित्रपसृष्टीतील ९०चं दशक शाहरुख खान, माधुरी, करिश्मा कपूर, सलमान खान यांनी तुफान गाजवलं. एकाहून एक सुपरहिट चित्रपट त्यांनी प्रेक्षकांना दिले जे आजही २०-२२ वर्षांनी प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. सध्या बॉलिवूडमध्ये जुने गाजलेले चित्रपट रि-रिलीज करण्याचा सपाटा सुरु आहे. यात ‘तुंबाड’, ‘कहो ना प्यार है’, ‘रेहना है तेरे दिल में’, ‘करण-अर्जुन’ अशा अनेक चित्रपटांचा समावेश होता. याच यादीत आता २८ वर्षांपूर्वी गाजलेला माधुरी, शाहरुख आणि करिश्माने चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार असून प्रेक्षक आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहात आहेत.(Dil to pagal hai)

“राहूल नाम तो सुना होगा…“ हा डायलॉग आजही ९०च्यादशकातील मुलांना लक्षात असेल. होय. माधुरी दीक्षित, शाहरुख खान (Shah rukh khan) आणि करिश्मा कपूर यांचा ‘दिल तो पागल है’ हा चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. माधुरी (Madhuri Dixit) आणि करिश्मा (Karishma Kapoor) दोघी डान्सर त्यामुळे या चित्रपटातील त्यांचा डान्स फेस ऑफ विशेष होता. शिवाय चित्रपटाती प्रत्येक गाणी एका वेगळ्याच झोनमध्ये आपल्याला घेऊन जाते. ३१ ऑक्टोबर १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या दिल तो पागल है या चित्रपाला त्याकाळी ‘सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफर’, ‘सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री’ आणि ‘लोकप्रिय चित्रपट’ असे ३ राष्ट्रीय पुरस्कार आणि तब्बल ८ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते. आणि आता २८ वर्षांनी २८ फेब्रुवारीला हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. (Bollywood re-release)

तर मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याची लाट आली आहे. नुकताच २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘सनम तेरी कसम’ ९ वर्षांनी पुन्हा एकदाप्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे रि-रिलीजमध्ये या चित्रपाने ३५ कोटींच्या पुढे कमाई केलीये. एकीकडे मराी, तमिळ, तेलुगू, कन्नडा या विविध भाषांमध्ये नव नव्या गोष्टी पाहायला मिथायत किंवा नवे प्रयोग पाहायला मिळत आहेत. पण हिंदी चित्रपटसृष्टीत रिमेक, रि-रिलीज, सीक्वेल या पलीकडे काहीतरी घडावे अशी प्रेक्षकांची देखील अपेक्षा आहे. (Entertainment tadaka)
================================
हे देखील वाचा: अमेरिकेत अवतरणार ‘सुंदरी’; Lavani King Ashish Patil चा नृत्याविष्कार
================================
‘दिल तो पागल है’ या चित्रपटात शाहरुख खान, माधुरी. दीक्षित, करिश्मा कपूर फरिदा जलाल, अक्षय कुमार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यश चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटाने १९९७ साली ३४ कोटींची कमाई केली होती.