Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

दिवाळीत Madhuri Dixit हिला टक्कल का करावं लागलं होतं?
सामान्य माणसांपासून ते अगदी सेलिब्रिटींपर्यंत सगळेच दिवाळी साजरी करण्यात मग्न आहेत… दरवर्षीची दिवाळी आपल्यासाठी खास असते… पण बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिच्यासाठी मात्र दिवाळीचा एक धक्कादाय अनुभव आहे… एका मुलाखतीत तिने तिच्या बालपणीच्या दिवाळीची कटू आठवण सांगितली होती… नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात…

तर, माधुरी दीक्षितने तिच्या बालपणीचा तो किस्सा आठवत सांगितले होते की, “एका दिवाळीला तिच्यासोबत खूप मोठा अपघात झाला होता. तिने मुलाखतीत सांगितलं होतं की,”एकदा मी माझ्या मैत्रिणीसोबत दिवाळी साजरी करत असताना, एका मुलाने माझ्या हातात असलेल्या फटाक्याला आग लावली. यामुळे माधुरीचा अपघात झाला. फटाक्याची आग माझ्या केसांना लागली आणि सर्व केस जळून गेले होते. केस खूप जास्त जळाल्याने टक्कल करावे लागले होते”…

पुढे माधुरीने म्हटले होते की, “मी देवाचे आभार मानते की, त्यावेळी माझ्या चेहऱ्याला काहीच झाले नाही. नाहीतर आज मी अभिनेत्री झाले नसते.” तो अपघात माधुरीसाठी एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हता. या घटनेनंतर माधुरी दीक्षित आजतागायत दिवाळीच्या दिवशी फटाक्यांपासून दूर राहते.
================================
हे देखील वाचा : Sridevi यांनी नकार दिलेल्या ‘या’ चित्रपटामुळे माधुरीला मिळाला धकधक गर्लचा टॅग!
================================
दरम्यान, माधुरीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘भूल भूलैय्या ३’ नंतर ती पुन्हा एकदा तृप्ती डिमरीसोबत ‘माँ बहन’ या चित्रपटात झळकणार आहे… आजवर १०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका आणि नृत्य सादर करणारी माधुरी मराठी चित्रपटांच्या प्रगतीसाठी निर्मिती क्षेत्रातही उतरली असून तिचा ‘पंचक’ (Panchak Movie) चित्रपट २०२३ मध्ये रिलीज झाला होता… याव्यतिरिक्त तिने ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटातही काम केलं होतं… आता पुन्हा एकदा माधुरी मराठी चित्रपटात कधी काम करेल याची वाट तिचे चाहते नक्कीच पाहात आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi