Madhuri Dixit : सलमान-शाहरुख नव्हे तर ‘या’ अभिनेत्यासोबत सर्वाधिक चित्रपटात

Madhuri Dixit : सलमान-शाहरुख नव्हे तर ‘या’ अभिनेत्यासोबत सर्वाधिक चित्रपटात दिसलीये ‘धकधक गर्ल’
बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri dixit) ३० वर्षांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालत आहे. माधुरी दीक्षितने सलमान खान (Salman Khan), शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांच्यासोबत चित्रपट केले. आणि तिची दोन्ही खानसोबत ऑनस्क्रिन कॅमेस्ट्री चांगली जुळलेली पाहायला मिळाली. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की माधुरीने कर्मशिअल सर्वाधिक हिट चित्रपट सलमान किंवा शाहरुख सोबत नाही तर एका वेगळ्याच अभिनेत्यांसोबत दिले आहेत. कोण आहे तो अभिनेता जाणून घेऊयात…(Bollywood news)
भारतीय चित्रपटसृष्टीच्या ८०-९०च्या दशकात माधुरी दीक्षित अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्यासोबत बऱ्याच चित्रपटांमध्ये दिसली होती. त्यांनी एकत्र ‘तेजाब’, ‘राम लखन’, ‘परिंदा’, ‘क्रिश्न कन्हैया’, ‘बेटा’ अशा जवळपास १५ पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये ही जोडी हिट ठरली होती. यापैकी ५ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले होते. (Anil Kapoor Movies)

अनिल कपूर व्यतिरिक्त माधुरी आणि संजय दत्त (Sanjay Dutt) यांच्या जोडीलाही प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं होतं. ‘साजन’, ‘खलनायक’ या चित्रपटांतील दोघांची जोडी आजही प्रेक्षकांना तितकीच आवडते. आयएमडीबीच्या माहितीनुसार, संजय दत्त आणि माधुरी दीक्षित ११ चित्रपटांमध्ये एकत्र झळकले असून त्यापैकी ५ चित्रपट हिट ठरले होते. (Sanjay Dutt Movies)

आता वळूयात माधुरीने काम केलेल्या सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यासोबतच्या चित्रपटांकडे. माधुरीने सलमानसोबत ४ चित्रपटांमध्ये काम केलं होतं आणि त्यापैकी ३ चित्रपट हिट झाले होते. तर माधुरी शाहरुख खान सोबत ६ चित्रपटांमध्ये दिसली होती आणि त्यापैकी २ चित्रपटच हिट झाले होते. त्यामुळे माधुरीने तिच्या अभिनय कारकिर्दीत सर्वाधिक चित्रपट अनिल कपूर यांच्यासोबत केले आहेत. (Entertainment)

दरम्यान, ‘भूल भूलैय्या ३’ नंतर माधुरी दीक्षित पुन्हा एकदा तृप्ती डिमरी सोबत ‘माँ बहन’ या चित्रपटात झळकणार असून हा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट असणार आहे. शिवाय, लवकरच राजश्री सलमान खान सोबत कौंटुबिक चित्रपट घेऊन येणार असून यात माधुरी आणि सलमान हम आपके है कौन नंतर पुन्हा एकदा एकत्र दिसणार अशा चर्चा देखील सुरु आहेत. (Madhuri Dixit upcoming movies)
===============================
हे देखील वाचा: ‘प्रेम त्रिकोणा’ची गोष्ट, माधुरी दीक्षित हुकमी प्रेयसी
===============================
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, माधुरी दीक्षित म्हणाली होती की, “माझा पुढचा प्रोजेक्ट तिच्या प्रेक्षकांना चकित करेल. या वर्षी मी स्वतःला आव्हान देणार आहे. मी लवकरच माझ्या पुढच्या प्रोजेक्टवर काम सुरू करणार आहे. हे खूप वेगळे आणि आव्हानात्मक आहे, जे मी यापूर्वी कधीही केले नाही”. (Bollywood tadaka)