Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

“मोठ्या हिंदी चित्रपटांमुळे चालणाऱ्या मराठी चित्रपटांच्या स्क्रीन काढल्या जातात”;Madhuri Dixit हिने व्यक्त केली खंत

 “मोठ्या हिंदी चित्रपटांमुळे चालणाऱ्या मराठी चित्रपटांच्या स्क्रीन काढल्या जातात”;Madhuri Dixit हिने व्यक्त केली खंत
मिक्स मसाला

“मोठ्या हिंदी चित्रपटांमुळे चालणाऱ्या मराठी चित्रपटांच्या स्क्रीन काढल्या जातात”;Madhuri Dixit हिने व्यक्त केली खंत

by रसिका शिंदे-पॉल 23/12/2025

२०२५ या वर्षात बऱ्याच मराठी चित्रपटांनी केवळ हिंदीच नाही पण साऊथच्याही बड्या चित्रपटांना टक्कर दिली आहे… सध्या ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपटासोबत उत्तर आणि आशा हे दोन मराठी चित्रपट तगडी टक्कर देताना दिसत आहेत… पण बऱ्याचदा मुंबईत मराठी चित्रपटांना प्राईम टाईम शो साठी वणवण करावी लागते ही निर्मात्यांची खंत आणि हे चित्र काही नवं नाही… यावरच आता अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिने आपलं मत मांडलं आहे… मोठ्या हिंदी चित्रपटांमुळे चालणारे मराठी चित्रपटांच्या स्क्रीन काढल्या जातात, अशी खंत तिनं व्यक्त केली आहे. नेमकं ती काय म्हणाली जाणून घेऊयात… (Marathi Movies 2025)

‘नवभारत टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत माधुरीने तिला आलेले अनुभव मांडले… माधुरीने १५ ऑगस्ट आणि पंचक या दोन मराठी चित्रपटांची निर्मीती केली आहे… त्यामुळे एक निर्माती म्हणून ती म्हणाली, “मराठी चित्रपटांना थिएटर मिळवणे हे अत्यंत जिकिरीचे काम आहे. जेव्हा एखादा मोठा हिंदी चित्रपट प्रदर्शित होतो, तेव्हा तो संपूर्णपणे थिएटरवर वर्चस्व गाजवतो. थिएटर मालकांच्या दृष्टीने पॉपकॉर्न, खाद्यपदार्थांची विक्री आणि इतर व्यावसायिक बाबी महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे मोठ्या बजेटच्या हिंदी चित्रपटांनाच जास्त प्राधान्य दिलं जातं”. (Bollywood News)

पुढे माधुरीने पुढे एका गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधत म्हटलं की, “छोट्या चित्रपटांची प्रेक्षकसंख्या वेगळी असते. त्यामुळे थिएटर मालकांना मोठे-मोठे चित्रपटच रिलीज व्हावेत असं वाटतं. आणि जर ती मोठी फिल्म चालली, तर जी मराठी फिल्म रिलीज झाली आहे आणि चांगली चालत असली तरी तिचे शो कमी केले जातात”. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी माधुरीने दोन महत्त्वाचे उपाय सुचवले. ती म्हणाली, म्हणूनच, आपल्याला अधिक थिएटर्सची गरज आहे किंवा या दिशेने काहीतरी ठोस संघटना/व्यवस्था उभी राहण्याची आवश्यकता आहे”. (Madhuri Dixit Movies)

================================

हे देखील वाचा : Karishma Kapoor ने ‘दिल तो पागल है’ मध्ये माधुरी दीक्षितसोबत काम करण्यास का दिलेला नकार?

================================

दरम्यान, माधुरी दीक्षित हिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच तिची जिओ हॉटस्टारवर ‘मिसेस देशपांडे’ (Mrs.Deshpande) ही क्राईम आणि सायकॉलॉजिकल वेब सीरीज रिलीज झाली… या सीरीजमध्ये आजवरह तिने कधीच न साकारलेली हटके भूमिका केली आहे… या व्यतिरिक्त लवकरच ती तृप्ती डिमरीसोबत ‘माँ बहन’  या चित्रपटातही दिसणार आहे… माधुरीने केवळ अभिनयातच नाही, तर निर्मितीतही मराठी सिनेसृष्टीला योगदान दिलं आहे. तिने ‘बकेट लिस्ट’ (Bucket List Marathi Movie) या चित्रपटातून मराठीत पदार्पण केलं होतं. त्यामुळे आता पुन्हा एकदा माधुरीने मराठीत अभिनेत्री म्हणून यावं अशी प्रेक्षकांची इच्छा आहे… आता ती इच्छा पुर्ण होणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor bollywood update dhakdhak girl Entertainment Entertainment News madhuri dixit movies madhuru dixit marathi movie producers mrs deshpande web series panchak movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.