Madhuri Dixit : सलमान-शाहरुख नव्हे तर ‘या’ अभिनेत्यासोबत सर्वाधिक चित्रपटात

Madhuri Dixit-Nene : सुपरस्टार असूनही माधुरीला का मिळायचा आईचा ओरडा?
डान्स, अभिनय, सौंदर्य याचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे लाखो दिलों की धडकन अभिनेत्री Madhuri Dixit. १९८४ साली ‘अबोध’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीला माधुरी दीक्षितच्या रुपात एक परिपक्व अभिनेत्री लाभली. ‘अबोध’ चित्रपटाने विशेष यश मिळवलं नसलं तरी माधुरी दीक्षितने आपला उत्कृष्ट अभिनय सातत्याने सादर करण्याचा कस सोडला नाही. ‘अबोध’नंतर बॅक टू बॅक ‘आवारा बाप’, ‘स्वाती’ असे काही फ्लॉप चित्रपट माधुरीचे ठरले. तिला खरी ‘द माधुरी दीक्षित’ ही ओळख १९८८ साली आलेल्या ‘तेजाब’ या चित्रपटाने दिली. ‘एक दो तीन…’ या गाण्यावरील माधुरीच्या डान्सने अख्ख मार्केट खाऊन टाकलं; तिचा डान्स आणि हे गाणं अजरामर झालं. ‘तेजाब’च्या यशानंतर माधुरीने एकापेक्षा हिट चित्रपट दिले. पण तुम्हाला माहित आहे का सुपरस्टार असूनही माधुरीला आईचा ओरडा कायमच मिळत होता. काय आहे हा भन्नाट किस्सा जाणून घेऊयात… (Madhuri Dixit)
तर, २००० साली ‘पुकार’ हा Madhuri Dixit चा चित्रपट येईपर्यंत तिने ‘दिल तो पागल है’, ‘कोयला’, ‘साजन’, ‘खलनायक’, ‘जमाई राजा’, असे अनेक दर्जेदार चित्रपट दिले होते. आता अभिनेत्री म्हटलं की फिटनेसकडे लक्ष देणं हे आलंच. कॉरिओग्राफर टेरेन्स लुईस याने तिला ‘पुकार’ या चित्रपटासाठी फिटनेस ट्रेनिंग दिलं होतं. टेरेन्सने एका मुलाखतीत माधुरी आणि तिच्या आईचा एक किस्सा सांगितला. १९९८ च्या काळात टेरेन्स कलाकारांच्या घरी जाऊन त्यांना ट्रेन्ड करत होता. एकेदिवशी टेरेन्सला माधुरीने फोन केला आणि घरी यायला सांगितलं. हा किस्सा १९९८ चा. आधी टेरेन्सला वाटलं की हा प्रॅन्क आहे पण नंतर वारंवार फोन आल्यावर माधुरीच आपल्याला फोन करतेय यावर त्याचा विश्वास बसला. आणि टेरेन्स पोहोचला माधुरी दीक्षितच्या घरी.

आता माधुरीच्या घरी आलोय म्हणजे नोकर-चाकर दार उघडतील असं टेरेन्सला वाटलं. मात्र, चापून चोपून केसांना तेल लावलेल्या माधुरीने दार उघडलं ते पाहूनच टेरेन्स आश्चर्यचकित झाला. त्याने विचारलं की ”नोकर नाहीये का?” माधुरी म्हणाली “ती झोपलीये तु चहा घेणार?” आणि चक्क माधुरीने टेरेन्ससाठी चहा केला. त्यानंतर सुरु झालं माधुरीचं फिटनेस ट्रेनिंग. (Entertainment Masala)
============
हे देखील वाचा : Crazxy Movie Review : सोहम शहाचा ‘क्रेजी’ आहे तरी कसा?
============
थोड्यावेळात तिथे माधुरीची आई आली आणि त्या तिला ओरडायलाच लागल्या. “काय आहे हे माधुरी तुला तुझा बेडरूम आवरतां येत नाही? पसारा किती केलायस?”, आई ओरडत असताना माधुरी फक्त हसून इतकंच म्हणाली, “हो हो आवरते”. त्यावर आई पुन्हा म्हणाली, “शुटला जाण्यापूर्वी हे सगळं आवरून तू जायला हवं”. म्हणजे माधुरीच्या आईचा द माधुरी दीक्षित ही एक स्टार आहे वगैरे असा काही आर्विभावच नव्हता. त्यांच्यासाठी ती केवळ त्यांची मुलगी माधुरी होती आणि त्या तिला ओरडत होत्या. (Entertainment Tadaka)

“आज जी सुपरस्टटार माधुरी दीक्षित आपण पाहतो ती इतकी डाऊन टू अर्थ का आहे? असा जर का प्रश्न कुणी विचारला तर त्याचं उत्तर तिला घरात तिच्या आई-वडिलांकडून मिळालेले संस्कार आहेत. तुम्ही बाहेर कितीही मोठे स्टार कलाकार असलात तरी घरात तुम्ही सामान्यच असता. आपली पाळं-मुळं, संस्कृती सोडून आपण कधीच वावरलं नाही पाहिजे ही शिकवण माधुरीला घरातून मिळाली आणि ती त्यादिवशी मलाही मिळाली”, असा माधुरी आणि तिच्या आईचा मजेशीर किस्सा टेरेन्सने सांगितला. (Untold Stories)
============
हे देखील वाचा : Ranbir Kapoor : ‘अॅनिमल’मधील त्या सीनसाठी रणबीर कसा तयार झाला?
============
आजही माधुरी दीक्षित म्हटलं की ‘देवदास’, ‘हम आपके है कौन’, ‘अंजाम’, ‘आरजू’ या चित्रपटांची नावं ओठांवर येतातच पण त्यासोबतच तिचा डान्स आणि तिची सुपरहिट गाणी देखील आठवतात. ‘मार डाला’, ‘चन्ने के खेत मै’, ‘अखिया मिलाऊ’, ‘के सरा’ अशी बरीच गाणी प्रेक्षकांच्या लक्षात आहेत आणि तिच्या डान्सची एक झलक पाहण्यासाठी चाहते आजही तितकेच उत्सुक असतात. तसेच, रि-रिलीजच्या ट्रेण्डमध्ये नुकताच माधुरी आणि Salman Khan चा ऑल टाईम हिट ‘हम आपके है कौन’ चित्रपट युके आणि कॅनडामध्ये रि-रिलीज करण्यात आला होता आणि प्रेक्षकांनी पुन्हा एकदा या चि६पटाला भरघोस प्रतिसाद दिला. (Bollywood update)