छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या Akshay Kumar याच्या ‘त्या’ चित्रपटाचं

Suresh Wadkar यांनी माधुरी दीक्षितचं लग्नाचं स्थळ नाकारलं होतं?
भक्ती गीतं असो किंवा हिंदीतील उडत्या चालींची गाणी असोत पद्मश्री सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांनी आजवर रसिक प्रेक्षकांच्या त्यांच्या आवाजाने मंत्रमुग्ध केलं आहे… त्यांच्या सुमधूर आवाजाने त्यांनी अनेक गाणी एव्हरग्रीन केली आहेत यात शंकाच नाही…. आज (७ ऑगस्ट) सुरेश वाडकर यांच्या वाढिदिवसानिमित्त आपण त्यांच्यासाठी आलेल्या एका स्थळाबद्दल इंटरेस्टिंग किस्सा जाणून घेणार आहोत… तर, सुरेश वाडकर यांना चक्क धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिचं लग्नासाठी स्थळ आलं होतं असं सांगितलं जातं… नेमका काय होता किस्सा जाणून घेऊयात…(Bollywood News)

तर, अशी चर्चा होती की सुरेश वाडकर यांना एकेकाळी माधुरी दीक्षित हिचं समोरुन लग्नासाठी स्थळ आलं होतं आणि त्यांनी चक्क ते नाकारलं होतं… मीडिया रिपोर्ट्सनुसार हा किस्सा असा होता की, माधुरीने चित्रपटांमध्ये करिअर करु नये असं तिच्या पालकांना वाटत होतं आणि म्हणूनच तिचं लवकर लग्न व्हावं यासाठी माधुरीच्या आई-वडिलांनी सुरेश वाडकरांना तिचं स्थळ पाठवलं होतं. पण ‘मुलगी खूपच बारीक आहे’ असं सांगत त्यांनी स्थळ नाकारले होते, अशी चर्चा रंगली होती. यावर स्वत: सुरेश वाडकर यांनी प्रतिक्रिया देत प्रकरण काय होतं याचा खुलासा एका मुलाखतीत केला होता…(Entertainment Gossips)

सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर त्यांनी नवभारत टाइम्सशी संवाद साधताना माधुरी दीक्षितच्या स्थळाबद्दल शहानिशा करणारा प्रस्न विचारण्यात आला होता.. त्यावर वाडकर म्हणाले होते की, “कधीतरी माधुरी दीक्षित मला वाटेत भेटली तर मला मारणार आहे, कारण त्या बातमीतील सत्य काय आहे हे जाणून न घेता अशा बातम्या पसरवणे म्हणजे दिव्यच. तिच्यासारख्या सुंदर मुलीचे स्थळ माझ्यासाठी आले असते तर मी त्याला स्वप्नातही नकार दिला नसता. माधुरी दीक्षितला कोण नकार देऊ शकेल? तसं घडलं असतं तर आज पद्मश्री पुरस्कार स्विकारताना ती माझ्यासोबत असती. ती इतकी चांगली मुलगी आहे, बिचारी आणि इतकी चांगली आहे की अजून काही बोलली नाही. नाहीतर ही बातमी इतकी चालली आहे की, एखाद्या दिवशी माधुरी माझ्यासमोर आली तर दोन कानाखाली वाजवेल. प्रसिद्धी मिळवण्यासाठी मी ही बातमी पसरवत असल्याचे तिला वाटेल.” त्यामुळे सुरेश वाडकर यांच्या उत्तरावरुन हे स्ष्ट झालं की कधीच त्यांना माधुरीचं स्थळ आलं नव्हतं आणि प्रसिद्धीसाठी देखील त्यांनी हे काही केलं नव्हतं…(Bollywood Untold stories)
================================
हे देखील वाचा : Madhuri Dixit : माधुरीला अभिनयात नाही, तर ‘या’ गोष्टीत करायचं होतं करिअर
=================================
दरम्यान, सुरेश वाडकर यांच्या गाण्यांबद्दल बोलायचं झालं तर आजवर त्यांनी ‘सीने में जलन’, ‘मेघा रे मेघा रे’, ‘मैं हूं प्रेम रोगी’, ‘मेरी किस्मत में तू नहीं शायद’, ‘तुमसे मिलकर’, ‘चप्पा चप्पा चरखा चले’ अशी हिंदी तर ‘न सांगताच आज’, ‘हृदयी वसंत फुलताना’, ‘राजा ललकारी अशी दे’, ‘ही दोस्ती तुटायची नाहीत’ अशी बरीच सुपरहिट मराठी गाणी गायली आहेत… आजही वाडकरांच्या आवाजातील एव्हरग्रीन गाणी आपल्या प्लेलिस्ट मध्ये असतातच…(Suresh Wadkar Songs)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi