Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rajkumar Rao : ‘भूल चूक माफ’ चित्रपटाने दमदार ओपनिंग केली

Chinmay Mandlekar : मराठमोळ्या दिग्दर्शकासोबत मनोज बाजपेयी साकारणार नवी भूमिका!

Hera Pheri 3 : पंकज त्रिपाठी पुन्हा परेश रावल यांची

Nepotism : केवळ ३ चित्रपट करुन ही Star Kid बॉलिवूडपासून

Smita Patil : “शेवटच्या क्षणांमध्ये ती फक्त माफी..”, बब्बर यांचं

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या ऐतिहासिकपटात ‘या’ मराठी कलाकाराची वर्णी!

Aishwerya Rai-Bachchan हिने कान्समध्ये पुन्हा जपली भारतीय संस्कृती; गाऊनवर कोरला

Deepika Padukone : दिग्दर्शकांनी दीपिकाला ‘स्पिरिट’ चित्रपटातून हटवलं?

Cannes2025: टॉम क्रुझच्या चित्रपटालाही भारतीय चित्रपटाने टाकलं मागे!

Avadhoot Gupte New Album: अवधूत गुप्तेंच्या ‘आई’ हा भावस्पर्शी अल्बमध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Mamta Kulkarni नुकताच संन्यास घेतलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी आहे मोठ्या संपत्तीची मालकीण

 Mamta Kulkarni नुकताच संन्यास घेतलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी आहे मोठ्या संपत्तीची मालकीण
मिक्स मसाला

Mamta Kulkarni नुकताच संन्यास घेतलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी आहे मोठ्या संपत्तीची मालकीण

by Jyotsna Kulkarni 27/01/2025

सध्या प्रयागराजमध्ये हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा धार्मिक सोहळा असलेला महाकुंभमेळा मोठ्या दिमाखात संपन्न होताना दिसत आहे. या महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने आपल्याला अनेक महान आणि मोठे साधू, संत, महात्मे यांचे दर्शन होत आहे. तब्बल १४४ वर्षानंतर संपन्न होत असलेला हा महाकुंभमेळा दररोज विविध कारणांमुळे चर्चेत येत आहे. या कुंभमेळ्याचे महत्व लक्षात घेऊन अनेक चांगल्या गोष्टी इथे घडत आहे. अशातच सर्व मनोरंजनविश्वाचे लक्ष वेधून घेणारी एक घटना प्रयोगराजमध्ये महाकुंभमेळ्यादरम्यान घडली आहे. (Mahakumbhmela 2025)

९० च्या दशकातील हिंदी सिनेमातील टॉपची अभिनेत्री अशी ओळख असलेल्या आणि मधल्या काही काळापासून गायब झालेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णीने (Mamta Kulkarni) संन्यास घेतला आहे. ममताने प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात संन्यास घेतला. ती किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झाली आहे. संन्यासानंतर ममताचे नाव बदलण्यात आले असून, आता ती श्री यमाई ममता नंद गिरी या नावाने ओळखली जाणार आहे. (Mamta Kulkarni)

Mamta Kulkarni

ममता कुलकर्णीबद्दल सांगायचे झाले तर ती ९० च्या दशकातील हिंदी चित्रपटांमधील अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिचा जन्म २० एप्रिल १९७२ रोजी मुंबईत एका मध्यमवर्गीय मराठी ब्राह्मण कुटुंबात झाला. ममता कुलकर्णीचे खरे नाव पद्मावती कुलकर्णी आहे. तिने सिनेसृष्टीत येण्यासाठी स्वतःचे नाव बदलले. ममताचा जन्म २० एप्रिल १९७२ रोजी मुंबईत एका मध्यमवर्गीय मराठी ब्राह्मण कुटुंबात झाला. (Bollywood Masala News)

ममता आणि तिचे कुटुंब मूळचे मुंबईचे. ती मुंबईतल्या वर्सोवा भागात राहायची. तिने तिचे मुंबईतील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. ममताला अभिनयात अजिबातच रस नव्हता. मात्र तिने या अभिनयाच्या क्षेत्रात काम करावे आणि याच क्षेत्रात आपले करियर करावे अशी तिच्या आईची खूपच इच्छा होती. त्यानुसार ममता कुलकर्णी अभिनयक्षेत्रात आली. (Entertainment Mix Masala)

ममता कुलकर्णीने १९९१ मध्ये तमिळ चित्रपट ‘नानबर्गल’ मधून तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले. मेरा दिल तेरे लिए, तिरंगा, वक्त हमारा है, वादे इरादे, क्रांतिकारी, छुपा रुस्तम, घातक, नसीब, किला, बेकाबू, जीवन युद्ध, करण अर्जुन, चायना गेट यांसारख्या चित्रपटांमध्ये ममता झळकली आहे. हिंदीबरोबरच मराठी, तमिळ, बंगाली चित्रपटही केले. तिचा शेवटचा चित्रपट ‘कभी तुम कभी हम’ २३ वर्षांपूर्वी २००२ मध्ये प्रदर्शित झाला होता. दिसायला सुंदर असलेली ममता अभिनयासोबतच डान्स देखील उत्तम करायची. त्यामुळे तर अधिकच जास्त गाजली. (Bollywood Tadka)

Mamta Kulkarni

एकीकडे चित्रपटांमध्ये मोठा नावलौकिक कमवत यश मिळवणारी ममता तिच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आली. १९९३ मध्ये तिने स्टारडस्ट मासिकासाठी टॉपलेस फोटोशूट केले होते. हे फोटोशूट समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. यानंतर तिला १५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता. सुरुवातीपासूनच ममता बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. त्यामुळे टॉपलेस फोटोशूट केल्यानंतर एकीकडे तिच्या बोल्डनेसची चर्चा झाली, मात्र दुसरीकडे तिच्यावर टीका देखील झाली.

======

हे देखील वाचा : Bobby Deol करियरच्या २८ वर्षांनी, वयाच्या ५३ व्या वर्षी चमकले बॉबी देओलचे नशीब मिळाले अफाट यश

Shreyas Talpade मराठीसोबत हिंदी चित्रपट गाजवणारे मराठमोळे नाव श्रेयस तळपदे

======

ममता नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात अडकत राहिली आणि चर्चेत आली. विवादित अभिनेत्री म्हणून देखील तिची ओळख तयार झाली होती. असे सांगितले जाते की, तिने विकी गोस्वामी या अंडरवर्ल्ड ड्रग माफियाशी लग्न केले होते. मात्र ममताने कधीच हे मान्य केले नाही. तिने फक्त ती विकिसोबत रिलेशनशिपमध्ये होती असे सांगत लग्नाच्या निव्वळ अफवा असल्याचे सांगितले होते. ममता विकीसोबत १० वर्षे दुबईत राहत होती. तिने तिच्या पतीसोबत मिळून अनेक बेकायदेशीर कामं केल्याचे देखील सांगितले जाते.

एका मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, ममता कुलकर्णीची एकूण संपत्ती अंदाजे ८५ कोटी रुपये आहे. बॉलीवूडमधून गायब झाल्यानंतरही तिच्याकडे बक्कळ संपत्ती होती. २००० मध्ये तिने इंडस्ट्री सोडली, त्यानंतर ती दुबईला निघून गेली. काही दिवसांपूर्वीच ती भारतात परतली आणि तिने महाकुंभमेळ्यात संन्यास घेतला.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Bollywood Bollywood Chitchat Celebrity Celebrity News Entertainment अभिनेत्री ममता कुलकर्णी ममता कुलकर्णी ममता कुलकर्णी माहिती ममता कुलकर्णी संन्यास ममता कुलकर्णीची संपत्ती
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.