Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Mrunmayee Deshpande : ‘मना’चे श्लोक’चा भन्नाट टीझर प्रदर्शित

Tango Malhar Movie Trailer: सिनेमातून उलगडणार रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास

MHJ Unplugged पॉडकास्ट सिरीजमध्येमधून उलगडणार आपल्या लाडक्या हास्यवीरांचं विनोदापलीकडलं आयुष्य

Kurla To Vengurla Trailer: ग्रामीण वास्तवाला विनोदी रंग देणारा कौटुंबिक

‘अमानुष’ : उत्तमकुमार- Sharmila Tagore यांचा अप्रतिम सिनेमा!

Siddharth Ray : “त्याला उचकी आली आणि…”, ‘अशी ही बनवाबनवी’तील

Jolly LLB 3: अक्षय कुमार-अर्शद वारसी येणार आमनेसामने!

Manoj Bajpayee : “मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो”!

सचिन पिळगांवकरांच्या तुफान ट्रोलिंगवर Shriya Pilgoankar म्हणाली, “शेवटी माझ्या बाबांना…”

Aatali Batami Phutli Trailer:  धमाल कॉमेडी आणि थराराने नटलेल्या सिनेमाचा ट्रेलर

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Maharani 4 Teaser: आता बिहारमधील सत्तेचा खेळ आणखी रंजक होणार ; हुमा कुरेशीच खेळणार सर्व डावपेच

 Maharani 4 Teaser: आता बिहारमधील सत्तेचा खेळ आणखी रंजक होणार ; हुमा कुरेशीच खेळणार सर्व डावपेच
Maharani 4 Teaser
मिक्स मसाला

Maharani 4 Teaser: आता बिहारमधील सत्तेचा खेळ आणखी रंजक होणार ; हुमा कुरेशीच खेळणार सर्व डावपेच

by Team KalakrutiMedia 04/03/2025

Biharच्या पार्श्वभूमीवर पॉवर प्ले चे उत्तम दर्शन घडवणाऱ्या ‘महाराणी‘ या वेबसीरिजच्या चौथ्या सीझनचा टीझर रिलीज झाला आहे. दमदार संवादांनी भरलेल्या या टीझरमधून ‘राणी भारती’चे दमदार पुनरागमन होत आहे. टीझर व्हिडिओमध्ये राणी भारतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री हुमा कुरेशी खुर्चीवर बसून प्रभावी संवाद देताना दिसत आहे. टीझरच्या सुरुवातीलाच हुमा सांगते की, तिला खुनी, अशिक्षित आणि भावी पंतप्रधान म्हटले आहे. मात्र, त्यांच्यासाठी राजकारणापेक्षा त्यांचे कुटुंब महत्त्वाचे आहे आणि बिहार हे त्यांचे कुटुंब आहे. ती टीजरमध्ये म्हणते , “किसी ने हमको गंवार कहा, किसी ने हत्यारन, तो किसी ने भावी प्रधानमंत्री.हमको सत्ता से नहीं, परिवार से मोह है.काहे कि बिहार ही हमरा असली परिवार है और अगर कोई हमारे परिवार को नुकसान पहुंचाए तो हम सत्ता हिला देंगे।”.(Maharani 4 Teaser)

Maharani 4 Teaser
Maharani 4 Teaser

महाराणी राणी भारतीसोबत नव्या आव्हानांना आणि संघर्षांना सामोरे जात पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने परतण्यास आता सज्ज झाली आहे.टीजर समोर आला असला तरी निर्मात्यांनी अद्याप मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही. ‘महाराणी’चा पहिला सीझन 2021 मध्ये सोनी लिव्हवर रिलीज झाला होता. या मालिकेत अभिनेत्री हुमा कुरेशी राणी भारतीची भूमिका साकारत आहे, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे. हुमाची व्यक्तिरेखा पाहिली तर अचानक राजकारणात पाऊल ठेवावं लागणारी एक साधी आणि अशिक्षित गृहिणी म्हणून तिचं चित्रण केलं जातं. पती भीमा जखमी झाल्यानंतर त्या बिहारच्या मुख्यमंत्री झाल्या मालिकेत हुमाच्या पतीची भूमिका अभिनेता सोहम शाह साकारत आहे. मालिकेचा दुसरा सीझन जुलै 2022 मध्ये आला होता, तर तिसरा सीझन 2024 मध्ये रिलीज झाला होता.  

Maharani 4 Teaser
Maharani 4 Teaser

महाराणी या वेब सीरिजमध्ये हुमा कुरेशी राणी भारतीची भूमिका साकारत आहे. ही मालिका बिहारच्या राजकारणावर आधारित असून त्याची कथा खऱ्या आयुष्यातील घटनांपासून प्रेरित आहे. या मालिकेचा पहिला सीझन 2021 मध्ये सोनीलिव्ह वर रिलीज झाला होता, त्यानंतर 2022 मध्ये दुसरा सीझन रिलीज झाला होता. महाराणीचा तिसरा सीझन 7 मार्च 2024 रोजी रिलीज झाला होता आणि आता चौथ्या सीझनची प्रतीक्षा आहे. या मालिकेची निर्मिती सुभाष कपूर यांनी केली होती, तर दिग्दर्शन सौरभ भावे यांनी केले होते. सुभाष कपूर, नंदन सिंग आणि उमाशंकर सिंग यांनी ते लिहिले होते.(Maharani 4 Teaser)

=============================

हे देखील वाचा: “A Perfect Murder”– रंगभूमीवरील अनोखा प्रवास, आता महिला विशेष प्रयोगासह!

=============================

आता महाराणी ४ मध्ये राणी भारती बिहारच्या राजकारणात कोणत्या नवीन गोष्टी आणणार आणि हा सीझन प्रेक्षकांना कितपत उत्तेजित करेल हे पाहावं लागेल.  

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Amit Sial Anuja Sathe Celebrity Dibyendu Bhattacharya Entertainment Huma Qureshi Kani Kusruti Maharani 4 Teaser Neha Chauhan Pramod Pathak Sohum Shah Sushil Pandey Vineet Kumar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.