Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Neena Kulkarni यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

Jitendra Kumar सचिवजींचा Bhagwat चित्रपटात दिसणार रुद्रावतार!

मीनाक्षी शेषाद्रीचा पहिला सिनेमा Painter Babu आठवतो का?

Digpal Lanjekar : शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प ‘रणपति शिवराय’- स्वारी

२०२५ मधील टॉप १० बॉलिवूडच्या यादीत Kantara 1 ची ग्रॅण्ड

Kantara : A Legend Chapter 1 चित्रपटाने बॉलिवूडलाही टाकलं मागे!

सर रिचर्ड अ‍ॅटेनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटात Rohini Hattangadi यांना कस्तुरबाची

Kantara Chapter 1 : कांताराने पुन्हा राडा घातलाय !

Treesha Thosar ने वेधलं बॉलिवूडचं लक्ष; शाहरुख खानही झाला फॅन

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Rajya Chitrapat Puraskar राज्य मराठी चित्रपट पुरस्कार नामांकन यादी जाहीर

 Rajya Chitrapat Puraskar राज्य मराठी चित्रपट पुरस्कार नामांकन यादी जाहीर
Press Release

Rajya Chitrapat Puraskar राज्य मराठी चित्रपट पुरस्कार नामांकन यादी जाहीर

by Jyotsna Kulkarni 28/01/2025

मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर करण्यात आले. (Rajya Chitrapat Puraskar)

सन २०२२ या वर्षातील साठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या (Rajya Chitrapat Puraskar) अंतिम फेरीसाठी अनन्या, पाँडिचेरी, सनी, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, 4 ब्लाईंड मेन, समायरा, गाभ, ह्या गोष्टीला नावच नाही, ग्लोबल आडगाव, हर हर महादेव या दहा चित्रपटांना अंतिम फेरीत नामांकन प्राप्त झाले आहे. मंत्री आशिष शेलार यांनी ६० व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्राथमिक फेरीची नामांकने जाहीर करताना तांत्रिक आणि बालकलाकार विभागातले पुरस्कार देखील जाहीर केले आहेत. (Latest Marathi News)

उत्कृष्ट बालकलाकार म्हणून श्रीनिवास पोकळे (छुमंतर) आणि अर्णव देशपांडे (आम्ही बटरफ्लाय) यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर तांत्रिक विभागामध्ये उत्कृष्ट कला दिग्दर्शन – महेश कुंडलकर (उनाड), उत्कृष्ट छाया लेखन – अभिजीत चौधरी (फोर ब्लाइंड मेन), ओंकार बर्वे (ह्या गोष्टीला नावच नाही) उत्कृष्ट संकलन – यश सुर्वे (काटा किर्र), उत्कृष्ट ध्वनिमुद्रन – सुहास राणे (ह्या गोष्टीला नावच नाही), उत्कृष्ट ध्वनी संयोजन – लोचन प्रताप कानविंदे (हर हर महादेव), उत्कृष्ट वेशभूषा – उज्वला सिंग (ताठ कणा), उत्कृष्ट रंगभूषा – सुमित जाधव (ताठ कणा) यांना राज्य शासनाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. (Entertainment mix masala)

Rajya Chitrapat Puraskar

नामनिर्देशन विभागातील पुरस्कारांची नामांकने पुढीलप्रमाणे

सर्वोत्कृष्ट कथा

१. अनिल कुमार साळवे (ग्लोबल आडगाव)

२. पूर्वल धोत्रे (4 ब्लाईंड मेन)

३. सुमित तांबे (समायरा )

उत्कृष्ट पटकथा

१. इरावती कर्णिक (सनी)

२. पूर्वल धोत्रे- अभिषेक मेरुरकर (4 ब्लाईंड मेन)

३. तेजस मोडक – सचिन कुंडलकर (पॉंडिचेरी)

उत्कृष्ट संवाद

१. प्रवीण तरडे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)

२. मकरंद माने (सोयरिक)

३. सचिन मुल्लेमवार (टेरिटरी)

उत्कृष्ट गीते

१. प्रशांत मडपूवार (ग्लोबल आडगाव/गाणे – यल्गार होऊ दे)

२. अभिषेक रवणकर (अनन्या/गाणे-ढगा आड या)

३. प्रकाश (बाबा) चव्हाण : (फतवा/गाणे-अलगद मन हे)

उत्कृष्ट संगीत

१. हितेश मोडक (हर हर महादेव)

२. निहार शेंबेकर (समायरा)

३. विजय गवंडे (सोंग्या)

उत्कृष्ट पार्श्वसंगीत

१. अविनाश विश्वजीत (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)

२. हनी सातमकर (आतुर)

३. सौमिल सिध्दार्थ (सनी)

उत्कृष्ट पार्श्वगायक

१. मनिष राजगिरे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे/गीत – भेटला विठ्ठल माझा)

२. पद्मनाभ गायकवाड (गुल्ह/ गीत – का रे जीव जळला)

३. अजय गोगावले (चंद्रमुखी/गीत – घे तुझ्यात सावलीत)

उत्कृष्ट पार्श्वगायिका

१. जुईली जोगळेकर (समायारा/गीत – सुंदर ते ध्यान)

२. आर्या आंबेकर (चंद्रमुखी/गीत – बाई ग कस करमत नाही)

३. अमिता घुगरी (सोयरिक/गीत – तुला काय सांगु कैना)

उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक

१. राहूल ठोंबरे-संजीव होवाळदार (टाईमपास 3 / गीत – कोल्ड्रीक वाटते गार, वाघाची डरकाळी )

२. उमेश जाधव (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे/गीत- आई जगदंबे)

३. श्री. सुजीत कुमार (सनी/ गीत – मी नाचणार भाई)

उत्कृष्ट अभिनेता

१. प्रसाद ओक (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)

२. वैभव तत्ववादी (पॉन्डीचेरी)

३. ललीत प्रभाकर (सनी)

उत्कृष्ट अभिनेत्री

१. सई ताम्हाणकर (पॉन्डेचेरी)

२. अमृता खानविलकर(चंद्रमुखी)

३. सोनाली कुलकर्णी (तमाशा लाईव्ह)

उत्कृष्ट विनोदी अभिनेता

१. मकरंद अनासपुरे (वऱ्हाडी वाजंत्री)

२. संजय नार्वेकर (टाईमपास)

३. भरत गणेशपुरे ( पिल्लू बॅचलर)

सहाय्यक अभिनेता

१. योगेश सोमण (अनन्या)

२. किशोर कदम (टेरीटरी)

३. सुबोध भावे (हर हर महादेव)

सहाय्यक अभिनेत्री

१. स्नेहल तरडे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)

२. क्षिती जोग (सनी)

३. मृण्मयी देशपांडे (चंद्रमुखी)

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता

१. अकुंर राठी (समायरा)

२. रोनक लांडगे (ग्लोबल आडगाव)

३. जयदीप कोडोलीकर (हया गोष्टीला नावच नाही)

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री

१. ऋता दुर्गुळे (अनन्या)

२. सायली बांदकर (गाभ)

३. मानसी भवालकर (सोयरिक)

प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती

१. आतुर

२. गुल्हर

३. ह्या गोष्टीला नावच नाही

प्रथम पदार्पण दिग्दर्शन

१. 4 ब्लाइंड मॅन

२. गाभ

३. अनन्या

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: 60th Maharashtra Rajya Marathi Chitrapat Puraskar Entertainment Featured Maharashtra Rajya Maharashtra Rajya Marathi Chitrapat Maharashtra Rajya Marathi Chitrapat Puraskar Maharashtra Rajya Marathi Chitrapat Puraskar 2022 Marathi Chitrapat Puraskar 2022 Marathi Movie मराठी चित्रपट पुरस्कार महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार राज्य मराठी चित्रपट पुरस्कार राज्य शासन मराठी चित्रपट पुरस्कार
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.