Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rashmika Mandanna & Vijay Devarkonda यांनी वेडिंग रिसेप्शनला ‘त्या’ कृतीने

Sanai Choughade Zee Marathi Serial: ‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता राज

Varsha Usgaonkar यांची 47 लाखांची फसवणूक! दिग्दर्शक-बिल्डरविरोधात गुन्हा दाखल…

‘I am Looser’ म्हणत Rakhi Sawantने पूलमध्ये मारली उडी; राराच्या

अभिनेत्री Aruna Irani अमिताभ बच्चनची नायिका कशी बनली?

Bigg Boss Marathi 6 मध्ये कॅप्टन्सी टास्कदरम्यान मोठा थरार; संकेतच्या

Vicky Kaushal त्या चिमुकलीपुढे झाला नतमस्तक!

Ranabaali Movie : तेलुगु चित्रपटसृष्टीत अजय-अतुलच्या संगीताचा डंका!

Grahan नावाच्या चित्रपटात नूतनचे नायक सुभाष घई

Big Boss Marathi 6 : ‘मी शोमध्ये असेपर्यंत तुझ्यासोबत बोलणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Maharashtrachi Hasyajatra फेम Dattu More ची विनोदापाठोपाठ व्यवसायातही एंट्री; सुरु केलं स्वतःच क्लाउड किचन…

 Maharashtrachi Hasyajatra फेम Dattu More ची विनोदापाठोपाठ व्यवसायातही एंट्री; सुरु केलं स्वतःच क्लाउड किचन…
Dattu More New Food Business
टीव्ही वाले मिक्स मसाला

Maharashtrachi Hasyajatra फेम Dattu More ची विनोदापाठोपाठ व्यवसायातही एंट्री; सुरु केलं स्वतःच क्लाउड किचन…

by Team KalakrutiMedia 06/02/2026

गेल्या काही काळात मराठी मनोरंजनसृष्टीत एक वेगळा ट्रेण्ड पाहायला मिळतोय. अभिनयासोबतच अनेक कलाकारांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करतनव्या क्षेत्रात पदार्पण केल्याच पहायला मिळत आहे . कुणी फॅशन ब्रँड उभारले, तर कुणी हॉटेल आणि फूड इंडस्ट्रीत आपलं नशीब आजमावलं. आता या यादीत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ( Maharashtrachi Hasyajatra) फेम विनोदी कलाकार दत्तू मोरे (Dattu More) याचंही नाव सामील झालं आहे. आपल्या हटके विनोदशैलीमुळे मराठी प्रेक्षकांच्या मनात घर करणारा दत्तू मोरे सध्या अभिनयामुळे नाही, तर एका नव्या व्यावसायिक निर्णयामुळे चर्चेत आहे. दत्तूनं नुकताच स्वतःचा छोटेखानी व्यवसाय सुरू केला असून, याबाबतची माहिती त्यानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओद्वारे दिली आहे.(Dattu More)

Dattu More
Dattu More Maharashtrachi hasyajatra

दत्तूने आता व्यवसायविश्वात पाऊल टाकत ठाण्यात ‘Daily Bowl’ नावाचं क्लाउड किचन सुरू केलं आहे. धावपळीच्या जीवनशैलीमुळे जंक आणि तेलकट पदार्थांकडे वाढणारा कल लक्षात घेत, त्यातून एक सकारात्मक पर्याय निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात, घरगुती चवीचे आणि पौष्टिक अन्न उपलब्ध करून देणं, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश असल्याचं दत्तूने स्पष्ट केलं आहे.या नव्या सुरुवातीसाठी दत्तूच्या मित्र-मैत्रिणींनी तसेच चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. खरंतर दत्तूसाठी हे वर्ष वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही पातळ्यांवर विशेष ठरत आहे. काही महिन्यांपूर्वीच तो वडील झाला असून, आता स्वतःच्या व्यवसायाची सुरुवात झाल्यानं त्याच्या आयुष्यात आनंदाचे नवे पर्व सुरू झालं आहे.

Dattu More
Dattu More Maharashtrachi Hasyajtra

या प्रवासात दत्तूला त्याची पत्नी डॉ. स्वाती घुनागे-मोरे यांचीही भक्कम साथ लाभत आहे. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वाती यांनी या उपक्रमासाठी त्याला मोलाचं मार्गदर्शन आणि पाठिंबा दिला आहे.दत्तूच्या कारकिर्दीकडे पाहिलं तर त्याचा प्रवास तितकाच प्रेरणादायी आहे. वागळे इस्टेटमधील रामनगर परिसरातल्या साध्या चाळीत वाढलेला दत्तू सुरुवातीला पडद्यामागे काम करत होता. मेहनत, सातत्य आणि स्वतःवरचा विश्वास यांच्या जोरावर तो कॅमेऱ्यासमोर आला आणि अल्पावधीतच प्रेक्षकांचा लाडका कलाकार बनला. (Dattu More)

===========================

हे देखील वाचा: Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam 2 आणि Jhimma 3 लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला !

===========================

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमानं अनेक नवोदित कलाकारांना ओळख मिळवून दिली आणि त्या यादीत दत्तू मोरेचं नाव आवर्जून घेतलं जातं. आज अभिनयासोबतच व्यवसायातही पाऊल टाकत दत्तू एक नवा आदर्श निर्माण करत असल्याचं चित्र दिसत आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity Daily Bowl cloud kitchen dattu more Dattu More cloud kitchen Entertainment maharashtrachi hasyajatra Marathi comedian business Marathi TV News
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.