Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!

प्रसाद खांडेकरने ‘या’ खास व्यक्तीसाठी लिहिली सुंदर पोस्ट
आज मनोरंजन क्षेत्रात आघाडीवर असलेले सर्वच लोकप्रिय कलाकारांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे. अतिशय मेहनत, प्रयत्न, चिकाटी आणि प्रतिभा यांच्या जोरावर हे कलाकार पुढे आले. प्रत्येक कलाकार मोठा होताना त्याला एक खंबीर साथ असणे खूपच आवश्यक असते. मग ती आईवडिलांची असो, पत्नीची असो, मित्रांची असो किंवा इतर कोणाची. ही साथ त्या व्यक्तीला काम करण्याची शक्ती देत पुढे जाण्यांसाठी अधिक प्रेरणा देते. आज जे कलाकार यशस्वी झाले आहेत, ते नेहमीच या साथ देणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या यशाचे श्रेय देतात.
असाच एक प्रसिद्ध विनोदी अभिनेता, लेखक असणाऱ्या कलाकाराने नुकतीच सोशल मीडियावर आपल्या पत्नीसाठी एक खास पोस्ट शेअर करत पत्नीचे कौतुक केले आहे. हा अभिनेता आहे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकर. हास्यजत्रेमधे आपल्या अभिनयाने आणि विनोदाने संपूर्ण महाराष्ट्राला हसवणाऱ्या प्रसादने लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी पत्नीसाठी एक पोस्ट शेअर केली असून, ही पोस्ट सध्या कमालीची गाजत आहे.
प्रसादने नुकतीच त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले. “लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको…बस तू आहेस बरोबर म्हणून तुझ्या साथीने एक एक टप्पा पार करतोय…अजून खुप टप्पे पार करायचेत…जसं प्रोत्साहन देत पुढे ढकलतेस तसंच प्रसंगी घट्ट पाय रोवून ठेहराव पण घ्यायला लावतेयस
प्रेमाची ९ वर्ष आणि लग्नाची ११ वर्ष…एकूण २० वर्ष कशी गेलीत कळलं नाही.
A post shared by Prasad Khandekar (@prasadmkhandekarofficial)
मित्रामधून प्रियकर
प्रियकरमधून नवरा
नवऱ्यामधून बाप
एकांकिकेतून नाटकामध्ये
नाटकांमधून टेलिव्हिजनवर
टेलिव्हिजनवरून सिनेमात
चाळीतून वन रुम किचनमध्ये
वन रुम किचनमधून १ बीएचकेमध्ये
१ बीएचकेमधून २ बीएचकेमध्ये
बेस्ट बसमधून बजाज चेतक स्कूटरवर
बजाज चेतक स्कूटरवरून बजाज एव्हेंजर
एव्हेंजरवरून फोर व्हीलर कार
या आणि अशा कित्येक प्रवासात बरोबर राहिली आहेस…म्हणून इथंपर्यंत पोहोचलोय
आय लव्ह यू सो मच मिसेस खांडेकर….अल्पा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…अशीच बरोबर राहा आणि हसत राहा…अप्पू”
दरम्यान प्रसादच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेच सोबतच त्याच्या हास्यजत्रेतील सहकलाकारांनी आणि इतर इंडस्ट्रीमधील कलाकारांनी देखील प्रसादला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून, अजून प्रगती करण्यासाठी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रसाद खांडेकरच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, लवकरच त्याचे एक नवीनकोरे नाटक रंगभूमीवर येत आहे. या नाटकाचे नाव ‘थेट तुमच्या घरातून’ असे असून, या नाटकाची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रसाद स्वतः सांभाळत आहे. ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकात प्रसादबरोबर शिवाली परब, ओंकार राऊत, भक्ती देसाई, प्रथमेश शिवलकर आणि नम्रता संभेराव पाहायला मिळणार आहेत.