Big Boss 19: ‘आता बघूच कोण जातंय…’ Pranit More साठी अंकिता वालावलकरने बसीर

Maharashtrachi Hasyajatra: ‘माझ्या आयुष्यात हास्यजत्रा नसती तर…’ समीर चौघुलेंनी ‘MHJ Unplugged’ मध्ये सांगितली खास गोष्ट !
समीर चौघुले हे नाव आज मराठी मनोरंजनविश्वात अतिशय परिचित आहे, आणि याचं सर्वात मोठं श्रेय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाला जातं. विनोदी अभिनय, अचूक टायमिंग आणि वेगळ्या व्यक्तिरेखांमधून समीर चौघुले यांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. ‘सुमारिया चौघुलिया’, ‘चोलन मजनू’ अशा भूमिकांनी त्यांना अनोखी ओळख मिळवून दिली.(Maharashtrachi Hasyajatra)

अलीकडेच सोनी मराठीवरील ‘MHJ Unplugged’ या खास कार्यक्रमात समीर चौघुले यांनी आपल्या प्रवासाबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला. ते म्हणाले, “’महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा माझ्या आयुष्यातला एक मोठा टर्निंग पॉइंट ठरला. हा कार्यक्रम नसता, तर समीर चौघुले कुठे असता हे सांगता येणार नाही. हास्यजत्रेमुळे मला स्वतःचं एक अस्तित्व मिळालं. गेल्या 15 वर्षांपासून मी हा फॉर्म करत आहे. हास्यजत्रेमुळे मी प्रेक्षकांच्या घरातला एक सदस्य झालो आहे.” ते पुढे म्हणाले, “लोकांच्या जवळ जाणं, त्यांचं प्रेम मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. वयस्कर आजी गोड हसत डोक्यावरून हात फिरवते, आणि गुळाची पोळी देते ‘ अशा अनेक भावनिक क्षणांमधून हास्यजत्रेने मला काय दिलं, याची खरी प्रचिती येते. हे सगळं शब्दांत सांगणं कठीण आहे.”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आज संपूर्ण जगभरात लोकप्रिय झाला आहे. लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतील प्रेक्षक त्याचा आनंद घेतात. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोशल मिडिया टाईमलाईनवर ही या कार्यक्रमाचा उल्लेख आहे. तसेच सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर यांसारख्या अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी देखील हा कार्यक्रम पाहिल्याचं सांगितलं आहे.(Maharashtrachi Hasyajatra)
==============================
हे देखील वाचा: एकटं वाटलं की मुंबईतल्या ‘या’ खास ठिकाणी जाऊन बसते Actress Rinku Rajguru !
==============================
हास्यजत्रेमुळे अनेक नवोदित कलाकारांना संधी मिळाली असून, त्यांच्या कलागुणांमुळे ते प्रेक्षकांचं मन जिंकत आहेत. काहींनी स्वतःचं घर उभं केलं, काहींनी पहिल्यांदाच परदेशवारी केली. गेल्या काही वर्षांपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम अखंडपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे आणि त्याचं योगदान अविस्मरणीय ठरत आहे.