Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

‘Maharashtrachi Hasyajatra’ची लवकरच ‘गिनीज बुक’मध्ये होणार नोंद; ‘हे’ आहे कारण…
गेल्या काही वर्षांत संपूर्ण महाराष्ट्राला हसवणारा आणि घराघरात पोहोचलेला कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. मंचावर प्रेक्षकांना पोट धरून हसवणारे हे कलाकार आता एका नव्या माध्यमातून भेटायला सज्ज झाले आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा अनप्लग्ड’ ही पॉडकास्ट सिरीज आजपासून प्रेक्षकांसमोर येत आहे.या सिरीजमधून लोकप्रिय हास्यवीर फक्त रंगमंचावरील विनोदापुरते मर्यादित राहणार नाहीत, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनोळखी पैलूंवरही प्रकाश टाकणार आहेत. प्रवासातील अविस्मरणीय आठवणी, आयुष्यात प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती, कधीही न सांगितलेले किस्से आणि त्यांच्या जडणघडणीमागचं खरं आयुष्य हे सगळं प्रेक्षकांना ‘अनप्लग्ड’च्या गप्पांमधून कळणार आहे.(Maharashtrachi Hasyajatra)

या पॉडकास्टचं सूत्रसंचालन सोनी मराठीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि अभिनेता अमित फाळके करत आहेत. सूत्रसंचालकासोबतच मुलाखतकाराच्या भूमिकेतून ते कलाकारांच्या प्रवासाची कहाणी उलगडणार आहेत. सुरुवातीच्या संघर्षापासून ते यशापर्यंत. पडद्यामागील किस्से, टीममधील मैत्री, जिव्हाळा आणि प्रेक्षकांच्या आवडत्या प्रहसनांच्या निर्मितीमागील गमतीशीर क्षण यातून समोर येतील. सुरुवातीच्या भागांमध्ये समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, प्राजक्ता माळी, पृथ्वीक प्रताप, प्रियदर्शनी इंदलकर आणि प्रभाकर मोरे हे कलाकार ‘अनप्लग्ड’मध्ये सहभागी होणार आहेत. या भागांचा आनंद प्रेक्षकांना सोनी मराठीच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवर घेता येईल.

या नव्या प्रयोगाबद्दल बोलताना अमित फाळके म्हणाले, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ लवकरच एक हजार भाग पूर्ण करणार आहे. तीन हजारांहून अधिक एपिसोड सादर करणारा हा एकमेव कार्यक्रम ठरेल. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या प्रवासाची नोंद व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमाचं पॉडकास्ट स्वरूपात रुपांतर करणं ही पहिलीच वेळ आहे. या नव्या उपक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची संधी मिळतेय, ही माझ्यासाठी मोठी आनंदाची बाब आहे.”(Maharashtrachi Hasyajatra)
===========================
हे देखील वाचा: Last Stop Khanda: ‘शालू झोका दे गो मैना’, Prabhakar More यांची शालू आहे तरी कोण?
===========================
हास्यजत्रेचा आनंद आता एका वेगळ्या रूपात अनुभवायला मिळणार आहे. पडद्यावर हसवणाऱ्या या कलाकारांचं विनोदापलीकडचं आयुष्य ‘अनप्लग्ड’मधून किती रंगतदार ठरतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.