Amitabh Bachchan : “जाण्याची वेळ झाली…”, पोस्टचा बिग बींनी केला

Mahakumbh : ‘महासंगम’ची घोषणा; कुंभमेळ्यावर आधारित कलाकृती येणार
प्रयागराजमध्ये १४४ वर्षांनी महाकुंभमेळा संपन्न झाला. जगभरातील भाविकांनी महाकुंभ जाऊन पवित्र स्नान घेतले. सामान्य नागरिकांसह परदेशातील कलाकारांसह बॉलिवूड कलाकार, उद्योगपती यांनी देखील संगमात स्नान केले. आता लवकरच ‘महाकुंभ’वर आधारित चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार असून यात ‘स्त्री २’ चित्रपट फेम अभिषेक बॅनर्जी या चित्रपटात झळकणार आहे. ‘महासंगम’ असे या चित्रपटाचे नाव असून नुकताच या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला. (Mahakumbh)

दिग्दर्शक भरत बाला ‘महासंगम’ (Mahakumbh) या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून या चित्रपटात वडिल, मुलगा आणि त्यांच्यातील भावनिक नातेसंबंध यावर भाष्य केलं जाणार आहे. चित्रपटाबद्दल माहिती देताना भरत बाला म्हणाले की, ‘महासंगम’ हा चित्रपट २६ फेब्रुवारीला संपलेल्या महाकुंभमेळ्यावर आधारित आहे. या महाकुंभमेळ्याला आलेल्या करोडो भक्तांच्या भावना आणि श्रद्धेवर चित्रपटाचे कथानक लिहिले गेले आहे. चित्रपटाची कथा तर अप्रतिम आहेच पण या चित्रपटाला ए.आर.रेहमान संगीत देणार असल्यामुळे हा चित्रपट अधिक खास आहे”, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. (Bollywood update)
=============================
हे देखील वाचा : Rajkumar Rao ने पत्नी Patralekha सोबत संगमात पवित्र स्नान करत साध्वी सरस्वतीसोबत केली विशेष पूजा!
=============================
१४४ वर्षांनी येणाऱ्या या महाकुंभमेळ्याला करोडोंच्या घरात भाविक जगाच्या कानाकोपऱ्यातून आले होते. शिवाय ग्लॅमर बाजूला ठेडून एक भक्त म्हणून बरेच कलाकार देखील महाकुंभमेळ्यात सहभागी झाले होते. विकी कौशल, कॅटरिना कैफ, राजकुमार राव, अनुपम खेर, अक्षय कुमार, प्राजक्ता माळी, Raveena tandon, प्रिती झिंटा यांच्यासह अंबानी कुटुंबियांनी देखील पवित्र स्नान केले होते.भक्तीने वातावरणात संपन्न झालेल्या महाकुंभमेळ्याची आणखी एक वेगळी बाजू लवकरच महासंगम याचित्रपटातून समोर येणार असल्यामुळे आता उत्सुकता अधिक शिगेला पोहोचलीये. या चित्रपटात अभिषेक बॅनर्जी आणि शहाना गोस्वामी प्रमुख भूमिका साकरणार असून लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (Kumbhamela 2025)