
ग्लोबली ३०० कोटींचा टप्पा पार करणारा Mahavatar Narsimha ठरला पहिला अॅनिमेटेड चित्रपट!
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आजवर बऱ्याच चित्रपटांनी जागतिक स्तरावर ५०० कोटींच्या पुढे बॉक्स ऑफिस कलेक्शन करत इतिहास रचला आहे… मात्र, भारतीय चित्रपटसृष्टीतील अॅनिमेटेड चित्रपटांच्या इतिहासात महावतार नरसिम्हा (Mahavatar Narsimha Movie) या अॅनिमेटेड चित्रपटाने ग्लोबली आपलं स्थान निर्माण केलं असून हा पहिला अॅनिमेटेड चित्रपट ठरला आहे ज्याने जगभऱात ३०० कोटींचा टप्पा बॉक्स ऑफिसवर पार केला आहे…(Bollywood News)

२५ जुलै २०२५ रोजी रिलीज झालेल्या महावतार नरसिम्हा या अॅनिमेटेड चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं आहे… इतकंच नाही तर त्यानंतर रिलीज झालेल्या ‘कुली’ (Coolie) आणि ‘वॉर २’ (War 2) चित्रपटांनाही त्याने मागे टाकलं आहे… ३२ व्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५० कोटींचा टप्पा पार केला असून ३०० कोटींकडे वाटचाल सुरु केली आहे.. आजवर कुठल्याच अॅनिमेटेड चित्रपटाने देशात आणि जगात इतकी कमाई केली नव्हती… सॅकनिल्कच्या माहितीनुसार, या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ४४.७५ कोटी, दुसऱ्या आठवड्यात ७३.४ कोटी, तिसऱ्या आठवड्यात ७०.२ कोटी, चौथ्या आठवड्यात ३०.४ कोटी कमवत आत्तापर्यंत देशभरात या चित्रपटाने २३७.१७ कोटी कमावले आहेत… तर, ग्लोबली या चित्रपटाने ३०० कोटींचा टप्पा पार केला आहे…
================================
हे देखील वाचा : Mahavatar Narsimha : भारतातील Animated चित्रपटांचं भव्य विश्व!
=================================
दरम्यान, होम्बले फिल्म्स आणि क्लिम प्रॉडक्शन्सने अधिकृतपणे अनेक अॅनिमेटेड चित्रपटांच्या सीरिजची घोषणा केली आहे. या फ्रँचायझीमधील आगामी महावतार परशुराम (२०२७), महावतार रघुनंदन (२०२९), महावतार धावकदेश (२०३१), महावतार गोकुलानंद (२०३३) आणि महावतार कल्की (२०३५-२०३७) या चित्रपटांचा समावेश आहे. (Homble films animated movie universe)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi