Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Lata Mangeshkar : ….नाहीतर आज लता दीदी चित्रपट निर्मात्या असत्या!
गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या सुमधुर आवाजांनी आपल्या कानांवर उत्कृष्ट संगीताचे संस्कार झाले आहेत. प्रत्येक बाजातील गाणी विविध भाषांमध्ये त्यांनी गायली. लता दीदींचे स्वर त्यांचा चाहता आजही विसरु शकला नसेल. पण तुम्हाला माहित आहे का? एकेकाळी लता दीदी चक्क चित्रपट निर्मात्या होणार होत्या… काय आहे हा नेमका किस्सा वक्की वाचा..(Bollywood)

मराठी चित्रपटसृष्टीतील टेक्नॉसॅव्ही दिग्दर्शक-अभिनेते महेश कोठारे (Mahesh Kotahre) यांनी महाएमटीबीशी बोलताना हा रंजक किस्सा आणि लता दीदींची आठवण सांगितली होती. कोठारे म्हणाले होते की, “लता दीदींची माझ्यासोबत चित्रपट करायची इच्छा होती. त्यांना मुळात तो चित्रपट निर्मित करायचा होता. ‘अंदाज’ या हिंदी चित्रपटाचा मराठी रिमेक करण्याची त्यांची प्रचंड इच्छा होती. त्यातील राज कपूरच्या (Raj Kapoor) भूमिकेत मी आणि दिलीप कुमारच्या (Dilip Kumar) भूमिकेत सचिन पिळगांवकर असावेत आणि मी तो चित्रपट दिग्दर्शित करावा अशी कल्पना त्यांच्या डोक्यात होती. पण दुर्दैवाने मी पुन्हा कधी त्यांना विचारलं नाही आणि ती मोठी कलाकृती बनवायची राहून गेली. नाहीतर आज गानकोकीळेसोबत लता दीदींची ओळख एक निर्माती म्हणूनही असती”. (Lata Mangeshkar songs)

लता दीदींचा आणखी एक खास किस्सा सांगताना ते म्हणाले की, “लता दीदी आणि माझं एक वेगळं नातं आहे. त्यांचा आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे २८ सप्टेंबरला असतो. याचाही एक खास किस्सा आहे. तो असा की, आधी लता दीदी आणि माझी थेट ओळख नव्हती. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींना मी एकदा सांगितलं की मला माझ्या वाढदिवशी लता दीदींसोबत बोलायचं आहे. त्यांनी मला एक फोन नंबर दिला आणि सांगितलं की यावर फोन कर थेट त्याच फोन उचलतील. त्याप्रमाणे मी फोन केला आणि लता दीदी माझ्याच फोनची वाट पाहात होत्या. त्यांनी फोन उचलताच मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या”.(Bollywood news)
================================
=================================
लता मंगेशकर यांच्या गाण्याबद्दल नवी ओळख काय करुन द्यायची? लता दीदींनी अनेक अभिनेत्रींना प्लेबॅक दिला. पण चक्क लता मंगेशकर यांनी महेश कोठारे यांच्या बालवयातील तीन गाण्यांनाही आवाज दिला होता. राजा और रंक मधील त्यातील एक लोकप्रिय गाणं म्हणजे “तु कितनी अच्छी है..” हे गाणं लता दीदींनी गायलं होत; जे निरुपा रॉय आणि महेश कोठारे यांच्यावर चित्रित झालं होतं.(Entertainment)