Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Shubhvivah मालिकेत चिन्मय उद्गीरकरची एंट्री; आकाशच्या जीवासाठी भूमी करणार संघर्ष

Ye Re Ye Re Paisa 3: सलमान खान, महेश मांजरेकर यांच्या

Kajol : “‘तिथे शूटिंग करताना मला नेहमीच अस्वस्थ वाटत होतं”

Sachin Pilgoankar- रंजिताचा ‘आंखियों के झरोखो से’आठवतो का?

Housefull 5 : मल्टिस्टार कास्ट असूनही अक्षय कुमारच्या चित्रपटाचं कलेक्शन

Shaitaan 2 : नवे चेहरे आणि नवी कथा; वशीकरणाची नवी

Housefull 5 मध्ये दगडूची भूमिका नाना पाटेकर नाही तर ‘या’

अजय देवगणच्या Son of Sardar 2 ची रिलीज डेट जाहिर!

Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

The Kashmir Files चित्रपटाने देशाची मानसिकता कशी बदलली?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

महेश लिमये घेऊन आले आहेत ह्यावर्षी आशेची रोषणाई.

 महेश लिमये घेऊन आले आहेत ह्यावर्षी आशेची रोषणाई.
कलाकृती विशेष

महेश लिमये घेऊन आले आहेत ह्यावर्षी आशेची रोषणाई.

by गणेश आचवाल 16/11/2020

“मला आठवते ती लहानपणची दिवाळी. दिवाळीच्या आधी शाळेची सहामाही परीक्षा
असायची. ती संपून शाळेला सुट्टी कधी लागत आहे,याचा आम्ही मित्र विचार
करायचो. कारण आम्हा मित्रांचे दिवाळीचे खूप मोठे प्लॅनिंग असायचे.

मुख्य म्हणजे किल्ले तयार करणे, हा आमचा आवडता उपक्रम असायचा. त्यासाठी
आम्ही माती कुठून आणायची,ते ठरवायचो. त्यात धान्य पेरणे,छोटे झाड लावणे हे सगळे खूप आनंदाने आम्ही करत होतो. दिवाळीच्या आधी आठ दिवस हे किल्ले तयार करण्याची खूप धमाल असायची. आम्ही कंदील देखील घरी करत होतो. त्या काळात केपांचे आणि टिकल्यांचे रोल असायचे आणि ते बंदुकीने फोडायचे, असा आम्हा मुलांचा उद्योग असायचा. दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहिला फटाका कोण लावणार, याची जणू स्पर्धाच असायची. मग सगळ्यांच्या आधी उठून पटकन तो  पहिला फटाका आपल्या हातून  लावला गेला पाहिजे, असे नियोजन असायचे.

हे हि वाचा : अभिजित-सुखदाचा विशेष दिवाळी पाडवा

अभ्यंगस्नान झाले की सर्व मित्रांकडे फराळासाठी जाणे व्हायचे आणि असे अगदी तिसरी चौथीपासून ते अगदी दहावीच्या दिवाळीपर्यंत चालू होते. फटाके आम्ही मित्र मंडळी पुरवून
पुरवून लावायचो. भाऊबीजेच्या दिवशी उरलेले सर्व फटाके एकत्र लावले जायचे आणि मग माळांचा कोट लावला जायचा. दिवाळीच्या दिवसात रांगोळी काढण्यात बहिणीला मी मदत करायचो, मग आमच्या घरातील रांगोळी काढून झाली की मग मित्रांकडे पण रांगोळी काढायला मदत करायला जायचो. हे सगळे आठवले की नॉस्टॅल्जीक व्हायला होते.  यावर्षीची दिवाळी ही खूप वेगळी असणार आहे. दिवाळीच्या निमित्ताने मी ‘आशेची रोषणाई’ ही शॉर्ट फिल्म दिग्दर्शित आणि चित्रित केली आहे.

क्षितिज पटवर्धन याने ती लिहिली असून पुनीत बालन स्टुडिओज यांची ती निर्मिती आहे. “दुसऱ्यासाठी उजळणे म्हणजे दिवाळी” हा संदेश देणारी ही शॉर्ट फिल्म आहे. तुम्हाला देखील ती फिल्म नक्की आवडेल. आज खरोखरच आपल्या भोवताली अशी अनेक माणसे आहेत की या काळात त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण व्हावा, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. त्यांच्या जीवनात आपण ‘आशेची रोषणाई’ निर्माण करण्याचा संकल्प करूया.”


  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: director Diwali Entertainment
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.