Jai Jai Swami Samarth मालिकेत निर्णायक वळण; भावनिक अध्यायाची होणार

महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम यांच्याबरोबर रंगणार ‘कोण होणार करोडपती’चा विशेष भाग
जनसामान्यांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘कोण होणार करोडपती’. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य.या आठवड्यात ‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या ‘विशेष भागात’ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि अभिनेते शिवाजी साटम हे हॉट सीटवर येणार आहेत. कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) या संस्थेसाठी महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. या पर्वातील हा विशेष भाग असणार आहे आणि या भागात महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम यांच्याशी गप्पा रंगणार आहेत. या जुन्या मित्रांसोबत रंगणाऱ्या गप्पा आणि किस्से पाहणे हे प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. त्याशिवाय ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर तीन जुनेमित्र एकत्र येणार आहेत. ते पाहणे नक्कीच गमतीदार असेल. (Kon Honar Crorepati)

पहिल्यांदा झालेली भेट ते आत्तापर्यंत एकत्र केलेली सगळी कामे यांबद्दलचे किस्से प्रेक्षकांना पाहायला मिळतील. महेश मांजरेकर, शिवाजी साटम आणि सचिन खेडेकर यांच्या मैत्रीचे अनोखे बंध आपल्याला या विशेष भागातून पाहायला मिळणार आहेत.सचिन खेडेकर, महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम यांचा गप्पा फारच रंगल्या. शिवाजी साटम यांनी आपले पहिले नाटक संगीत वरदान या वेळचा किस्सा सांगत पहिल्यांदा ते प्रेक्षकांना कसे सामोरे गेले याची आठवण सांगितली. त्या वेळी महेश मांजरेकर यांनी ‘कूछ तो गडबड है’ असे म्हणत शिवाजी साटम यांची फिरकी घ्यायचा प्रयत्न केला. महेश मांजरेकर यांनी आपल्या पहिल्यावाहिल्या ऑडिशनची आठवण या वेळी सांगितली.

मैत्री विशेष अशा या भागात सचिन खेडेकर, महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम यांच्या आजवरच्या मैत्रीचे किस्से पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे या दिग्गज कलाकारांना एकाच वेळी एकाच मंचावर पाहणे ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) या संस्थेसाठी महेश मांजरेकरआणि शिवाजी साटम ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. महेश मांजरेकर स्वतः कॅन्सरच्या आजारातून बरे होऊन आले आहेत, तर कॅन्सर पेशंट्सना कोणत्याही प्रकारे जी काही मदत करता येईल, त्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेणार, असे त्यांनी सांगितले.(Kon Honar Crorepati)
=================================
हे देखील वाचा: प्राजक्ता आणि विरुची अनोखी प्रेमकथा ‘तुजं माजं सपान’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…
=================================
‘कोण होणार करोडपती’च्या खेळाबरोबरच महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम यांचे मनोरंजक अनुभव आपल्याला ‘कोण होणार करोडपती’ विशेष, १७ जून, शनिवारी रात्री ९ वाजता,सोनी मराठी वाहिनीवर घेता येणार आहे.