‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Mahesh Manjrekar : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या शिवरायांचा अनोखा प्रवास!
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा आगामी ‘पुन्हा एकदा शिवाजीराजे भोसले!’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे… २००९ मध्ये ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाच्या यशानंतर तब्बल १६ वर्षांनी आता त्याच पठडीतील हा चित्रपट असून यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची व्यथा मांडण्याचा मांजरेकरांनी प्रयत्न केला आहे… नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला… महाराष्ट्राची प्रेरणा आणि अस्मितेचा मानबिंदू असलेले छत्रपती शिवाजी महाराज आजच्या काळात अवतरतात आणि इथल्या शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची दखल घेण्यासाठी लढतात अशी रोचक कल्पना असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलरही अंगावर शहारे आणणारा आहे. (Mahesh Manjrekar Movie)

दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले की, ‘’शेतकरी आत्महत्येचा विषय मला अनेक वर्षांपासून अस्वस्थ करत होता. या विषयाचा सखोल अभ्यास करताना मला जाणवलं की, यावर काहीतरी करायलाच हवं. समाजासमोर हा प्रश्न मांडायला हवा. राष्ट्रीय पुरस्कार विजेते बालकलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांना घेऊन एक चित्रपट करण्याचा विचार करत होतो आणि त्या प्रक्रियेत या चित्रपटाची निर्मिती झाली. सध्याच्या काळातील शेतकऱ्यांची स्थिती पाहून महाराज किती संतप्त होऊ शकतात, हे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाचा आहे.” (Marathi movie 2025)
================================
================================
३१ ऑक्टोबर २०२५ रोजी रिलीज होणाऱ्या या चित्रपटात विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने ,नित्यश्री, भार्गव जगताप, त्रिशा ठोसर आणि सयाजी शिंदे हे मातब्बर कलाकार झळकणार आहेत.चित्रपटाची कथा आणि पटकथा महेश मांजरेकर यांची असून राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांनी निर्मिती केली आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi