Ramayana : “काही गोष्टी शब्दांत मांडण्यापलिकडे असतात”;आलिया झाली भावूक!

Mahesh Manjrekar : ‘आता थांबायचं नाय’चित्रपटाबद्दल मांजरेकरांनी व्यक्त केलं स्पष्ट मत!
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या विविध विषयांवर आधारित चित्रपट प्रदर्शित होत असून प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देताना दिसत आहेत. १ मे महाराष्ट्र दिनी भरत जाधव यांची प्रमुख भूमिका असणारा ‘आता थांबायचं नाय’ (Aata Thambayach Naay) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी दिलेल्या उत्तुंग प्रतिसादामुळे बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने उत्तम कमाई केली आहे. आता दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी देखील या चित्रपटाबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. काय म्हणाले ते वाचा…(Marathi movies)
महेश मांजरेकर यांनी रेडिओ सिटीला मुलाखत देताना आता थांबायचं नाय चित्रपटाचं कौतुक केलं. ते म्हणाले की, “दिग्दर्शकांची कमी नाही. पण, ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट मला सकारात्मक वाटत आहे. खूप चांगला चित्रपट वाटतोय. मी आशा करतो की या चित्रपटाने १०० कोटी कमवावेत. त्या चित्रपटात खरेपणा दिसतो.”(Entertainment news)

दरम्यान, शिवराज वायचळ दिग्दर्शित ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भुतकर, आशुतोष गोवारीकर, रोहिणी हट्टंगडी, प्राजक्ता हणमघर, पर्ण पेठे, किरण खोजे अशी दिग्गज कलाकार मंडळी चित्रपटात आहे. तसेच, आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने ३.८७ कोटींची कमाई केली आहे.(Bollywood)
==================================
==================================
तर, महेश मांजरेकर यांचाही ‘देवमाणूस’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. पहिल्यांदाच रेणूका शहाणेसोबत (Renuka Shahane) काम केलं होतं. तसेच, माजरेकरांनी ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाची घोषणा केली असून या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवा, या वर्षी मराठी चित्रपटांची ताकद दाखवायची आहे असं देखील त्यांनी म्हटलं होतं.(Bollywood masala)