Mangalashtaka Returns : वृषभ शाह, शीतल अहिरराव या नव्या जोडीचा

Mahesh Manjrekar : “माझ्या महाराष्ट्राने हिंदी इंडस्ट्रीला वाचवलं आहे”
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित भव्य ऐतिहासिक चित्रपट ‘छावा’ (Chhaava) सध्या विशेष चर्चेत आहे. थिएटर गाजवल्यानंतर ओटीटीवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांनी मनं जिंकत आहेच. चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली असून यावरुन आता दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांनी माझ्या महाराष्ट्राने हिंदी इंडस्ट्रीला वाचवलं आहे आणि छावा चित्रपट केवळ त्याने साकारलेली भूमिका पाहायला आल्याचं विधान केलं आहे. काय म्हणाले? नेमके मांजरेकर वाचा… (Chhaava movie)

‘देवमाणूस’ (Devmanus) हा महेश मांजरेकर यांचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मिरची मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये महेश मांजरेकर यांनी छावा चित्रपटाबद्दल मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की,” ‘छावा’ (Chhaava) या चित्रपटाने ८०० कोटींचा गल्ला जमवला. या एकूण कमाईमध्ये महाराष्ट्राचा ८० टक्के वाटा आहे. माझ्या महाराष्ट्राने हिंदी इंडस्ट्रीला वाचवलं आहे”. पुढे त्यांनी विकीच्या (Vicky Kaushal) अभिनयाचे कौतुक करत प्रेक्षक त्याला बघायला आले नसून त्याने साकारलेल्या भूमिकेला बघायला आल्याचेही म्हटलं. (Mahesh manjarekar)

महेश म्हणाले की, “आज हिंदी चित्रपटांची जी परिस्थिती आहे ती फारच दारुण आहे. म्हणजे माझ्या महाराष्ट्राने हिंदी इंडस्ट्रीला वाचवलं आहे. आज ‘छावा’ चालला आहे; त्यापैकी ८० टक्के श्रेय हे महाराष्ट्राला जातं आणि त्या ८० टक्क्यांपैकी ९० टक्के पुणेला जातं. बाकीचं महाराष्ट्राला… त्यामुळे आज महाराष्ट्र इंडस्ट्री तारू शकतो. गेल्या काही दिवसांत बरेच चित्रपट चालले नाहीत. त्यातल्या त्यात ‘लापता लेडीज’ बऱ्यापैकी चालला. त्यामुळे आता वर्चस्ववादी कलाकारांना कळायला लागलं आहे की, ते कमाईचे आकडे गाठू शकत नाहीत.” (Entertainment trending news)

विकीच्या अभिनयाबद्दल बोलताना ते म्हणाले की, “विकी कौशल खूप चांगला अभिनेता आहे. त्याच्या ‘छावा’ चित्रपटाने ८०० कोटींची कमाई केली. पण विकी कौशलने कधीच असं म्हणू नये की, प्रेक्षक त्याला बघायला आले. कारण असं असतं तर ते आधीचे पाच चित्रपटही बघायला आले असते. प्रेक्षक त्याची भूमिका बघायला आले. त्याचे याआधीचे पाच चित्रपट नव्हतेच चालले. जोपर्यंत तो हा विचार करेल तोपर्यंत तो मोठा होईल. अभिनेता म्हणून तो चांगलाच आहे, पण ज्यावेळी अभिनेत्याला असं वाटतं की, तो एकटा प्रेक्षक घेऊन येत आहे तेव्हा अभिनेता संपतो.” (Bollywood films)
==============
हे देखील वाचा : Laxmikant Berde : लक्ष्मीकांत बेर्डे यांना केवळ १ रुपया देऊन ‘या’ दिग्दर्शकाने केले होते साईन
==============
दरम्यान, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपटात विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे तर रश्मिका मंदाना हिने महाराणी सेयूबाईंची भूमिका लीलया साकारली आहे. आत्तापर्यंत छावाने ग्रॉस कलेक्शन ८०७.४० कोटी कमावले आहेत. (Chhaava box office collection)