छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या Akshay Kumar याच्या ‘त्या’ चित्रपटाचं

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या Akshay Kumar याच्या ‘त्या’ चित्रपटाचं झालं तरी काय?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित जितके ऐतिहासिक चित्रपट यावे तितकेच कमी वाटतात… काही चित्रपट आले पण काही अजूनही बरीच वर्ष लोटून गेली तरी अडकलेच आहेत.. यापैकी एक चित्रपट म्हणजे महेश मांजरेकर यांचा ‘वेडात मराठे वीर दौडले सात…’ या चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार होता… मात्र, केवळ चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर पुढे चित्रपटाचं काय झालं हे अद्याप कुणालाच माहित नाही… त्यामुळे चित्रपट बंद झाला की काय अशा चर्चा होऊ लागलेल्या. आता चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे…

महेश मांजरेकरांच्या या चित्रपटात अभिनेता विराट मडके जिवाजी पाटील ही भूमिका साकारणार होता. नुकताच त्याने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे…. तो म्हणाला की,”चित्रपट खूप सुंदर शूट झाला आहे. तांत्रिकदृष्ट्या चित्रपट खूप चांगला बनला. महाराजांच्या काळातली कोणतीच गोष्ट तुम्ही काल्पनिक दाखवू शकत नाही या गोष्टीला तिथे वाव होता. प्रतापरावांसोबत जे सहा जण लढलेले ते नक्की कोण होते याचं ठाम उत्तर कोणाकडेच नाही. याबाबत अधिकृत नोंदही नाही. बाबासाहेब पुरंदरेंनी जी नाव लिहिली तीच लोकप्रिय झाली आहेत. महेश सरांनी त्यांच्या पद्धतीने अभ्यास करून हे सहा वीर दाखवले आहेत. प्रत्येकाची कथा खूप छान गुंफली आहे. अक्षय कुमारने सुद्धा खूप छान भूमिका निभावून नेली आहे. त्यात पाहून त्याला मराठी येत नाही असं वाटत नाही.”
=======================================
हे देखील वाचा: Aamhi Saare Khavayye चं दमदार कमबॅक; ‘जोडीचा मामला’ सह होणार आंबट-गोड खुलासा !
=======================================
दरम्यान, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात अक्षय कुमार शिवराय साकारणार असल्यामुळे सगळ्यांचं विशेष लक्ष या चित्रपटाकडे आहे… या चित्रपटात अक्षयसोबत सत्य मांजरेकर, प्रवीण तरडे, विशाल निकम, हार्दिक जोशी, जय दुधाने, विराट मडके, आणि उत्कर्ष शिंदे ही स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi