Gulkand Marathi Movie: प्रेमाच्या गुलकंदाची चव चाखवणारे ‘गुलकंद’चे शीर्षकगीत ‘प्रेमाचा

Maharashtrachi Hasyajatra: महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर Mahesh Manjrekar खेळणार क्रिकेटचा डाव!
Sony Marathi वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यामध्ये अनेक दिग्गज नामवंतांचाही समावेश आहे. आता महाराष्ट्राची हास्यजत्रा कॉमेडीची हॅटट्रीक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतच आहे. नवनवीन गोष्टी आपल्याला या सीजन मध्ये नक्कीच पाहायला मिळत आहेत. त्यातील एक सरप्राईस येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

जेष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांनी नुकतीच महाराष्ट्राची हास्यजत्रा च्या मंचावर उपस्थिती लावली. फक्त हजेरीच नाही लावली तर महेश मांजरेकर यांनी हास्यजत्राचे मंच देखील गाजवला. चक्क महेश मांजरेकर महाराष्ट्राची हास्यजत्रा चा मंचावर प्रहसन करताना दिसणार आहेत. देवमाणूस (Devmanus) या चित्रपटासाठी महेश मांजरेकर आणि चित्रपटाची संपूर्ण टीम महाराष्ट्राची हास्यजत्रा च्या मंचावर येणार आहेत आणि हास्यजत्रेचा आनंद घेणार आहेत.

विशेष म्हणजे महेश मांजरेकर या विशेष भागात एक संपूर्ण प्रहसन करणार आहेत. हास्यमहारथी समीर चौघुले (Sameer Chougule), अभिनेत्री चेतना भट, अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर, अभिनेता रोहित माने आणि मंदार मांडवकर या कलाकारांसोबत ते आपल्याला दिसणार आहेत. शूटिंग शूटिंग असे या प्रहसनाचे नाव असून धमाकेदार असे प्रहसन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
======================================
हे देखील वाचा: DEVMANUS : लव फिल्म्सच्या ‘देवमाणूसमध्ये ‘आलेच मी’ म्हणत सई ताम्हणकर पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर !
======================================
या आधी देखील महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) हास्यजत्रेतील प्रहसनाचा भाग झाले होते. या प्रहसनामध्ये महेश मांजरेकर हास्यविरांसोबत मंचावर चक्क क्रिकेट खेळताना आपल्याला दिसणार आहेत. आता ते आपल्याला या विशेष भागात पाहायला मिळेल महेश मांजरेकर हास्य विरांची विकेट घेतात कि हास्य वीर महेश मांजरेकरांनी. हे पाहण्यासाठी आपल्याला हा महाराष्ट्राची हास्यजत्रा चा हा विशेष भाग पाहायला लागेल.जो तुम्हाला पाहता येणार आहे बुधवारी रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर.